Illegal Sand Mining | नायगाव येथे गोदावरीत अवैध वाळू तस्करीवर पैठण पोलिसांची धडक; 12.22 लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal Sand Mining | या प्रकरणी चार वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Illegal Sand Mining
Illegal Sand Mining
Published on
Updated on
Summary
  1. नायगाव येथील गोदावरी नदीतून सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीवर पोलिसांची कारवाई

  2. तीन ट्रॅक्टर, यारी मशीन व वाहनासह १२.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

  3. चार वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल

  4. अवैध वाळू वाहतुकीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व पाईपलाईन फुटण्याच्या तक्रारी

  5. दि. २६ जानेवारी रोजी पहाटे पैठण पोलिसांचा नदीपात्रात छापा

पैठण : पुढारी वृत्तसेवा
पैठण तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीतून दररोज रात्री मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीविरोधात पैठण पोलिसांनी कडक कारवाई करत तब्बल १२ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal Sand Mining
Ashwini Pacharne: वाफगाव - रेटवडी गटात अश्विनीताई पाचारणे ठरताहेत लोकप्रिय उमेदवार

नायगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा व वाहतूक सुरू होती. या अवैध वाळू तस्करीमुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून पाण्याच्या पाईपलाईन फुटण्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पैठण पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६ जानेवारी रोजी पहाटे पैठण पोलीस पथकाने नायगाव येथील गोदावरी नदीपात्रात अचानक छापा टाकला.

Illegal Sand Mining
Pune Crime: पुणे हादरले! पती-पत्नीचा वाद झाला अन् आईने पोटच्या मुलाचा जीव घेतला

या कारवाईत गौतम कारभारी बल्लाळ (रा. चनकवाडी), हनुमान सदाशिव गिरगे (रा. नायगाव), गणेश सदाशिव गिरगे (रा. वडवळी) आणि तीर्थराज दत्तात्रय गिरगे (रा. नायगाव) हे तीन ट्रॅक्टरला यारी मशीन लावून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक करताना आढळून आले.

पोलीस पथकाने पंचनामा करून तीन ट्रॅक्टर, वाळू उपशासाठी वापरण्यात येणारी यारी मशीन तसेच एक ब्रास वाळू वाहतूक करणारे छोटे वाहन असा एकूण १२ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार राजेश आटोळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news