Ganje Village History | समृद्ध संस्कृती, प्राचीन वारसा जोपासणारे ऐतिहासिक 'गांजे'

Ganje Village History | परिक्रमा गांजे - देवता अजित उमर्ये
Ganje Village History
Ganje Village History
Published on
Updated on

विशेष वृत्त :
२३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित असलेल्या गांजे गावाच्या परिक्रमेसाठी आम्ही निघालो. आपण राहतो त्या परिसराची अनभिज्ञ माहिती जाणून घेण्यासाठी ही परिक्रमा सुरु झाली. ठिकाण माहीत नसल्यामुळे गुगल मॅपवर लोकेशन टाकून आम्ही आंबेव्हरी पुलावर पोहोचलो. करमळातून मी खाली उतरलो आणि तेवढ्यात माझ्या लहान मुलाने, 'अरे, मी इथे पूर्वी आलो आहे!' म्हटले.

Ganje Village History
Goa Bench High Court | कांदोळीतील 'किंग्स मॅन्शन' रिसॉर्ट अडचणीत; मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाची नोटीस

जवळच बोंडला अभयारण्य आहे. शाळकरी मुलांना पक्षीनिरीक्षणासाठी घेऊन येताना आम्ही यापूर्वी येथे काही वेळ थांबलो होतो. आज प्रा. राजेंद्र केळकर काय वेगळे दाखवणार, याचे कुतूहल होते.
प्रत्येक परिक्रमेत एका वेगळ्या गावाची भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक बाजू उलगडतात. गांजे गाव समृद्ध संस्कृती, प्राचीन वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण कृषीसंस्कृतीचा वारसा लाभलेले आहे. पूर्वी सत्तरी तालुक्यात असलेले हे गाव भौगोलिक व प्रशासकीय कारणांमुळे सध्या उसगाव-गांजे संयुक्त पंचायतीचा भाग म्हणून फोंडा तालुक्याशी जोडले गेले आहे.

मांडवी नदीच्या खोऱ्यात वसलेले हे गाव समृद्ध संस्कृती, प्राचीन वारसा आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक घडामोडींसाठी ओळखले जाते. जुन्या काळात गांजे हे एक महत्त्वाचे व्यापारी बंदर होते.

घाटमाथ्याकडे मालाची ने-आण करण्यासाठी या बंदराचा उपयोग होत असे. पणजीपासून सुमारे ४४.७ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव ४७४.०५ हेक्टर क्षेत्रफळात विस्तारलेले आहे. आज काहीसे दुर्लक्षित असलेले गांजे पूर्वी व्यापार आणि विविध उद्योगांमध्ये गुंतलेल्या लोकांमुळे गजबजलेले होते.

गांजे गावाला तीनवेळा महापुराचा फटका बसला. आंबेव्हरी पुलावरून पाहताना म्हादई नदीचे भरलेले पात्र नजरेत भरते. 'करंज' आणि 'शिरणी' यांसारखी झाडे नदीकाठची परिसंस्था टिकवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. १९२३, १९५५ आणि १९८२ या वर्षांत महापुराची स्थिती अनुभवली आहे.

'चव्हाटो' अन् धार्मिक परंपरा

आम्ही 'चव्हाटो' या ठिकाणी गेलो. चार रस्ते जिथे एकत्र येतात, त्या ठिकाणाला चव्हाटो असे म्हणतात. चव्हाट्यावरील मंदिरात महालक्ष्मीचा फोटो आहे; मात्र पूर्वी हे ठिकाण देवराईचा भाग असल्यामुळे गावाच्या देवीला उत्सवात स्थानापन्न करून विशेष मान दिला जातो.

गांजेमध्ये सात दिवसांचा लक्ष्मीपूजनाचा उत्सव विशेष उत्साहाने आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. होळीच्या काळात 'चोर' उत्सव साजरा करण्याचीही परंपरा आहे. पालखीतून देवीची मिरवणूक काढली जाते आणि त्या वेळी देवीचे श्रद्धापूर्वक स्वागत केले जाते. पारंपारिक पद्धतीने चोरांची मिरवणूक काढली जाते आणि घरोघरी त्यांची पूजा केली जाते.

Ganje Village History
Goa Police | गोवा पोलिस दलाचा सर्वोच्च सन्मान! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 'प्रेसिडेंट्स कलर' प्रदान

गांजेश्वरी आणि शांतादुर्गा मंदिर

गावातील मुख्य मंदिर परिसरात शांतादुर्गेचे मंदिर आहे. मुख्य देवालयाच्या मध्यभागी गजालक्ष्मी अर्थात केळबाय देवीची मूर्ती असून तीही शांतादुर्गाच्या रूपात पूजली जाते. तिच्या एका बाजूला गांजेश्वरी मूर्ती होडीच्या सिंहासनावर विराजमान आहे, तर दुसऱ्या बाजूला गणपती आणि योद्धा पुरुषाची प्रतिमा आहे. गांजे येथील शांतादुर्गा परिवारातील गांजेश्वरी आणि शेळ मेळावलीतील सातैरी परिवारातील गांजेश्वरी यांच्यात पूर्वापार भाऊबंदकी असावीत, असे दिसून येते.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक 'हजरत पीर नौरोदिन शाह दर्गा'

गावात हिंदू-मुस्लिम धार्मिक ऐक्याचे प्रतीक असलेला हजरत पीर नौरोदिन शाह यांचा दर्गा आहे. या दर्ग्यामुळे गावातील हिंदू-मुस्लिम बंधुभाव आणि सलोख्याची प्रदीर्घ परंपरा आजही जिवंत असल्याचे जाणवते. उरुसाच्या वेळी हिंदू बांधव दर्ग्यावर चादर चढवतात, तर मुस्लिम बांधवही देवीच्या उत्सवात उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे गांजे येथील हा दर्गा केवळ धार्मिक स्थळ न राहता सामाजिक ऐक्य, परस्पर आदर आणि सांस्कृतिक सहअस्तित्वाचे प्रतीक बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news