Mandovi River Casino Protest | कॅसिनोविरोधात 'इनफ इज इनफ'ची हायकोर्टात धाव! मांडवी नदीतील प्रस्तावित जहाजाला न्यायालयात आव्हान

Mandovi River Casino Protest | फेर्दीन रिबेलो : 'इनफ इज इनफ'तर्फे तालुका समित्या स्थापणार
Casinos
Casinos
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मांडवी नदीत प्रस्तावित असलेल्या नव्या कॅसिनो जहाजा विरोधात सोमवारी (दि. ९) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली जाणार आहे, अशी माहिती इनफ इज इनफ अभियानाचे प्रमुख निवृत्त मुख्य न्यायमूर्ती फेर्दीन रिबेलो यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Casinos
Goa Education Budget 2026 | शिक्षण खात्यासाठी ३,४३९ कोटी

त्यासोबतच राज्यभरात जनजागृती मोहीम सुरू केली जाणार असून त्यासाठी तालुका पातळीवरील समित्या स्थापन करण्यात आल्याचेही ते म्हणाले. दोनापावला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रिबेलो यांनी सांगितले की, उत्तर गोवा समन्वयक म्हणून गोविंद शिरोडकर, देविदास आमोणकर, फ्रान्सिस्को कुएलो व स्वप्नील शेर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर दक्षिण गोव्याचे समन्वयक म्हणून एल्वीस गोम्स, अॅड. क्लियोपात कुतिन्हो, सांतोन कॉस्टा व संदेश प्रभुदेसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Casinos
Goa theft news | खासगी इस्पितळात लॅपटॉपसहित दीड लाख रुपये लंपास

त्याचबरोबर काणकोण तालुका समिती स्थापन केल्याचे रिबेलो यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्याच्या समितीचा प्रमुख राज्य समितीच्या कोअर समितीवर असेल, असेही त्यांनी सांगितले. सरकारला आपण राज्याची वहन क्षमता तपासण्याची सूचना केली होती. मात्र अर्थसंकल्पात त्यासाठी काही तरतूद केलेली नाही. यावरुन सरकारला तशी इच्छा नाही असे दिसते, असे रिबेलो म्हणाले. गुरुवारी १२ रोजी कोअर समितीची बैठक घेतली जाणार असून १५ रोजी काणकोणमध्ये बैठक होईल, असे सांगून कॅसिनो आणि नगर नियोजन कायद्यात ३९ (ए) या बाबतचे इनफ इज इनफची भूमिका कायम असल्याचे निवृत्त न्यायाधीश रिबेलो म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news