Theft
Theft

Goa theft news | खासगी इस्पितळात लॅपटॉपसहित दीड लाख रुपये लंपास

Published on

मडगाव : मालभाट येथील व्हिक्टर इस्पितळाच्या परिसरात दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत आयटी विभागातील तीन लॅपटॉप लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सुमारे १.५० लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याने रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.

अवघ्या ४० मिनिटांच्या कालावधीत ही चोरी घडली. चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील आयटी कार्यालय तसेच फूड अँड फॅसिलिटी विभागाच्या कार्यालयात प्रवेश करून ही चोरी केली. कार्यालयीन कामकाज सुरू असतानाच चोरी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हॉस्पिटलचे आयटी व्यवस्थापक रॉय नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी बेकायदेशीर फायद्याच्या उद्देशाने ही चोरी केली. घटनेनंतर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली असून संशयितांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी मडगाव पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news