Sex Scandal Case | कुडचडे प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार! पीडितांना न्याय देण्यासाठी बालहक्क आयोग मैदानात

Sex Scandal Case | बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष शशिकांत पुनाजी यांची माहिती
Sex Scandal Case
Sex Scandal Case
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कुडचडे येथे उघडकीस आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने सक्रिय भूमिका घेतली असून, पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी पोलिसांच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष शशिकांत पुनाजी यांनी दै. 'पुढारी 'शी बोलताना दिली.

Sex Scandal Case
Omkar Elephant | 'ओंकार' हत्तीचा नेतर्डे परिसरात मुक्काम! जयराम गवस यांच्या काजू बागेत दर्शन झाल्याने ग्रामस्थांची धाकधूक

ते म्हणाले की, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून याचा ताबडतोब सोक्षमोक्ष लागणे आणि भविष्यातील अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्या लागतील. एकंदरीत घटनेचा अभ्यास केल्यावर हे समजले की, लैंगिक शोषणाच्या या घटना मागील २ ते ३ वर्षांमधील आहेत.

त्यामुळे तेव्हा अल्पवयीन असलेल्या पीडित मुली आता १८ वर्षांच्या झाल्या असतील तर त्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केवळ महिला आयोगाला आहे. उर्वरित अल्पवयीन पीडितांबाबत आम्ही पाठपुरावा करणार आहोत.

सध्या सदर प्रकरण गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रँच) वर्ग करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून पीडितांच्या स्थितीबाबत नियमित अहवाल घेतला जात आहे. यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

अॅड. सोफिया डिसुझा, शलाका देसाई, संजीवनी देसाई यांसह आयोगाचे सदस्य स्वतः पीडितांची भेट घेऊन त्यांना मानसिक व कायदेशीर मदत देणार असून पीडितांना जे काही सहाय्य आवश्यक असेल ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही अध्यक्षांनी नमूद केले.

Sex Scandal Case
Goa Sexual Harassment Cases | शालेय विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचाराच्या 12 घटना नोंद

सदर प्रकरणातील सर्व पीडितांना न्याय मिळेपर्यंत आयोगाचा हस्तक्षेप सुरू राहील, असे सांगत त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून प्रकरणातील पुढील घडामोडींवर लक्ष ठेवले जाईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.

पीडितांची ओळख गोपनीय

या प्रकरणात समाजातील दबाव आणि पालकांच्या भीतीमुळे अनेक मुली पुढे येण्यास घाबरत आहेत. मात्र पुढे आल्याशिवाय प्रकरणात अधिक कठोर करता येणार नाही. त्यामुळे पीडितांच्या पालकांनीच पुढे यावे. अशा घटनांमध्ये पालकांनी आपल्या मुलींना पाठिंबा देऊन न्याय मिळवण्यासाठी समोर यावे. पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहनही अध्यक्षांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news