Achal Vishram Kubal Kavi Art | दोडामार्गच्या आचल कुबल यांच्या कलेला लोकभवनात मानाचे स्थान

Achal Vishram Kubal Kavi Art | मणेरीतील जठार बाबा यांचे चित्र वाढवतेय राज्यपाल सदनाची शोभा
Achal Vishram Kubal Kavi Art | दोडामार्गच्या आचल कुबल यांच्या कलेला लोकभवनात मानाचे स्थान
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कोकणातील पारंपरिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कावी कलेला नवसंजीवनी देण्याचे महत्त्वपूर्ण काम मणेरी (ता. दोडामार्ग, सिंधुदुर्ग) येथील युवा कलाकार आचल विश्राम कुबल करीत आहेत.

Achal Vishram Kubal Kavi Art | दोडामार्गच्या आचल कुबल यांच्या कलेला लोकभवनात मानाचे स्थान
Revolutionary Goan Party: भूमिपूत्रांचा पक्ष असलेल्या 'रिव्होल्यूशनरी गोवन्स'चा दोन नेत्यांमधील वादामुळे 'फुटबॉल' का झालाय?

आधुनिक काळात प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल आणि डिजिटल कलांच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक कलेचे अस्तित्व धोक्यात आले असताना आचल यांनी आपल्या मेहनतीने आणि कलात्मकतेने कावी कलेचे संवर्धन करण्याचा स्तुत्य प्रयत्न सुरू ठेवला आहे. आचल यांनी साकारलेले मणेरी येथील श्री जठार बाबा यांचे अप्रतिम कावी चित्र आता थेट गोवा येथील राजभवन येथे स्थान मिळवणार आहे.

Achal Vishram Kubal Kavi Art | दोडामार्गच्या आचल कुबल यांच्या कलेला लोकभवनात मानाचे स्थान
Revolutionary Goans Party | गोव्यात 'आरजी' पक्षात उभी फूट? मनोज परब यांच्या बैठकीकडे आमदार वीरेश बोरकर यांची पाठ

आचलच्य चित्राला राज (लोक) भवनात स्थान मिळणे हा त्यांच्या कालप्रवासातील मैलाचा दगड ठरला आहे. कावी कला ही कोकणातील पारंपरिक भित्तीचित्र शैली म्हणून ओळखली जाते. पंचायत समिती सदस्य सोनिया अंकुश नाईक, तसेच भाजपचे तालुका चिटणीस अंकुश नाईक यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news