Goa Dhangar ST Reservation 2026 | 'एसटी' आरक्षणाचा दोन महिन्यांत निर्णय घ्या

Goa Dhangar ST Reservation 2026 | धनगर समाज अध्यक्ष बाबू कवळेकर : शिष्टमंडळासह घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Goa Dhangar ST Reservation 2026 | 'एसटी' आरक्षणाचा दोन महिन्यांत निर्णय घ्या
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याची मागणी करत माजी उपमुख्यमंत्री तथा गोवा धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील धनगर समाजाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या प्रश्नावर सरकारने येत्या दोन महिन्यांत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करत शिष्टमंडळाने सरकारला सूचनावजा इशारा दिला.

Goa Dhangar ST Reservation 2026 | 'एसटी' आरक्षणाचा दोन महिन्यांत निर्णय घ्या
Goa Dhangar Samaj Controversy | धनगर समाज 'एसटी'साठी आक्रमक

गोव्यातील गावडा, कुणबी, वेळीप आणि धनगर या चार समाजांना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलन सुरू झाले होते. मात्र २००३ मध्ये गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाला एसटी दर्जा मिळाला, तर धनगर समाज या प्रक्रियेपासून वंचित राहिला. त्यानंतर गेल्या २३ वर्षांपासून धनगर समाज लोकशाही मार्गाने एसटी दर्जासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील बारा तालुक्यांतील विविध धनगर संघटनांच्या प्रतिनिधींसह बाबू कवळेकर यांनी पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

यावेळी विविध धनगर संघटनांचे सुमारे ५० ते ६० पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना बाबू कवळेकर म्हणाले की, २००३ पूर्वीपासून धनगर समाज एसटी दर्जाची मागणी करत आहे. विद्यमान सरकारने ही मागणी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि मुख्यमंत्री यांनी दिल्लीमध्ये यासंदर्भात विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

Goa Dhangar ST Reservation 2026 | 'एसटी' आरक्षणाचा दोन महिन्यांत निर्णय घ्या
ST Political Reservation | गोव्यातील एसटी आरक्षणासाठी भाजप दिल्लीत सक्रिय! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह बडे नेते हायकमांडच्या दारी

धनगर समाजाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला दिल्ली येथे नेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आदिवासी कार्यमंत्र्यांची भेट घडवून आणावी, अशी मागणीही करण्यात आली असून मुख्यमंत्री यांनी ती मान्य केल्याचे कवळेकर यांनी सांगितले. महाराष्ट्रातील गवळी समाजासोबत गोव्यातील धनगर समाजाचा संदर्भ जोडला गेल्यामुळे एसटी दर्जाच्या प्रक्रियेला विलंब झाला.

मात्र आता सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून केंद्र सरकारने धनगर समाजाला एसटी दर्जा देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला एसटी दर्जा मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यातील बारा तालुक्यांमधील धनगर समाज समित्यांतर्फे आमदार आणि मंत्र्यांना निवेदने देण्यात येत आहे.

... अन्यथा वेगळा विचार करणार

धनगर समाजाने नेहमीच भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे. मात्र, सरकारने समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. गेली २३ वर्षे धनगर समाज लोकशाही मार्गाने एसटी दर्जाची मागणी करत आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये समाजाला वेगळा राजकीय विचार करावा लागेल, असा इशारा गोवा धनगर समाज संघटनेचे माजी अध्यक्ष लक्ष्मण कवळेकर यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news