नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीचा प्रतिष्ठित लाल किल्ला आणि अनेक प्रमुख सरकारी इमारती दिव्यांनी आणि सणासुदीच्या रोषणाईने सजवल्या जात आहेत, कारण १० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू आहे. दिवाळीला युनेस्कोकडून सांस्कृतिक वारसाचा दर्जा बहाल होण्याची शक्यता असल्याने राजधानीत दिवाळीसारखी लगबग सुरू झाली आहे. फटाक्यांचीही आतषबाजी संस्कृती मंत्रालयाने या उत्सवाच्या समन्वयासाठी दिल्ली सरकारशी औपचारिकपणे संपर्क साधला आहे.
दिल्लीचे संस्कृती मंत्री कपिल मिश्रा यांनी सांगितले की, प्रमुख ऐतिहासिक स्मारकांसोबतच दिल्ली सरकारच्या इमारतींवरही दिवे आणि सजावटीची रोषणाई केली जाईल. मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर आयोजित केला जाईल, तर त्याच्या सभोवतालचा चांदनी चौक परिसर रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजवला जाईल.
तपशिलानुसार, या उत्सवाचा भाग म्हणून फटाक्यांची आतषबाजी करण्याचेही नियोजन आहे. एका व्यापक निर्देशाद्वारे, दिवाळीच्या प्रस्तावाला युनेस्कोची मान्यता मिळण्याची शक्यता या बैठकीत विविध देशांकडून अमूर्त सांस्कृतिक वारशासाठी एकूण ५४ प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. भारताने केवळ एकच प्रस्ताव सादर केला आहे, तो म्हणजे दिवाळीचा. हा प्रस्ताव अजेंड्यावर २४ व्या क्रमांकावर आहे आणि त्यावर ९ आणि १० डिसेंबर रोजी चर्चा होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की या प्रस्तावाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. संस्कृती मंत्रालयाने देशभरातील सर्व जागतिक वारसा स्थळे त्याच दिवशी सायंकाळी दिव्यांनी विशेषतः उजळवण्याचे निर्देश दिले आहेत.
भारताकडे प्रथमच युनेस्को पॅनेलचे यजमानपद
भारत प्रथमच युनेस्को पॅनेलच्या सत्राचे यजमानपद भूषवत आहे. उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, युनेस्कोचे महासंचालक खलिद अल-एनानी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि भारताचे राजदूत आणि युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा उपस्थित होते. युनेस्कोच्या मते, हे सत्र सदस्य राष्ट्रांनी अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेशासाठी सादर केलेल्या नामांकनांचे मूल्यांकन करेल, विद्यमान घटकांच्या स्थितीचा आढावा घेतला जाईल.