

Damu held 114 large meetings
पणजी : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व मगो युतीच्या एरून ४३ उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी भारजपचे प्रदेश अध्यक्ष दामोदर उर्फ दामू नाईक यांनी तब्बल ११४ मोठ्या सभा घेतल्या. तर लहान सभा व बैठकांची संख्याही १०० च्या वर आहे. तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७९ सभा घेतल्या.
भाजपतर्फे ४० उमेदवार उभे करण्यात आले असून तीन मगो पक्षाच्या उमेदवारांना भाजपने पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर जे अपक्ष आमदार सरकार सोबत आहेत. त्यांनी उभे केलेल्या ७ अपक्ष उमेदवारांनाही भाजपने पाठिंबा दिलेला आहे.
अपक्ष उमेदवार वगळता भाजप व मगो युतीच्या ४३ उमेदवारांच्या प्रचारासाठी दामू दामोदर नाईक यांनी ११४ मोठ्या सभा घेतल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी दिली. दामू नाईक यांनी भाजपसोबत मागोच्या उमेदवारांसाठीही जाहीर प्रचार केला. एका जिल्हा पंचायत मतदारसंघात तीन ते चार पंचायती व अनेक गावे आहेत त्यामुळे प्रत्येक पंचायतीत किमान एक सभा घेण्यावर नाईक यांनी भर दिला. त्या सोबतच अनेक लहान बैठका व कोपरा सभाही दामू नाईक यांनी घेऊन त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत होत.
सक्षम गोंय असलेल्या पहिल्या पक्षीय निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही ७९ मोठ्या सभासह अनेक लहान सभा व बैठका घेतल्या. प्रशासन सांभाळून त्यानी या सभा घेतल्या. नवी दिल्लीत संसद अधिवेशन सुरु आहे, त्यामुळे खासदाराना जास्त सभा घेता आल्या नाहीत तरीही उत्तर गोवा लोकसभेचे खासदार असलेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना गोव्यात शनिवार व रविवारी असताना दोन दिवसांमध्ये ११ सभा घेतल्या तर खासदार सदानंद शेट तानावडे यांनी ३५ ते ३६ सभा घेतल्या.
उमेदवारांच्या सहकार्याने नियोजन
राज्यातील मंत्री व आमदारांनी आपापल्या विधानसभा क्षेत्रात सभा, बैठका व घरोघरी प्रचार करून भाजप उमेदवारांचा प्रचार केला. प्रदेश भाजप कार्यालय व स्थानिक मंडळ समिती यांनी स्थानिक आमदार, मंत्री व उमेदवारांच्या सहकार्याने सयुंक्तपणे या सर्व सभांचे नियोजन केल्याची माहिती अनेक सभांना उपस्थित राहिलेले कुकळ्येकर यांनी दिली.