Online Fraud| ईडीचे बनावट वॉरंट पाठवून ४५ लाख लुटणारा भामटा गजाआड

अडीच महिन्यांनी भामटा जेरबंद : मनी लाँडरिंगमध्ये आधार कार्ड मिळाल्याची बतावणी
Online Fraud
ईडीचे बनावट वॉरंट पाठवून ४५ लाख लुटणारा भामटा गजाआडFile Photo

पोलिस अधिकारी असल्याचे भासवून व ईडीचे बनावट अटक वॉरंट पाठवून ४५ लाख रुपये लुटणाऱ्या भामट्याला अखेर गोवा पोलिसांच्या सायबर टीमने तब्बल अडीच महिन्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, दोन चेक बुक, ज्यातील १७ चेक कोरे व सह्या केलेले आहेत.

Online Fraud
Mumbai Traffic Issue| रिगल जंक्शन, काळाघोडा परिसरातील वाहतुकीत बदल

अटक केलेल्या संशयिताचे नाव विवेक प्रमोद गौतम (वय ३२, शिवोली, मूळ आग्रा, उत्तर प्रदेश) असे आहे. सायबर विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२४ रोजी ९.३० वा. मोबाईल नंबरवरून ट्राय ऑथॉरिटीकडून बोलत असल्याचे सांगून तोतया व्यक्तीकडून तक्रारदारास कॉल आला. त्याने त्यांना तुमचे आधार कार्ड अवैध सावकारीसाठी वापरले जात आहे असे सांगितले. त्यानंतर त्याने

पोलिस अधिकारी असल्याचे सांगून केली तोतयेगिरी

आपण आरामबाग पोलिस अधिकारी असल्याचे सांगून तोतयेगिरी केली. आणि पुढे अंमलबजावणी संचालनालयाने तक्रारदाराच्या नावावर बनावट वॉरंट जारी केले आणि त्याला ४५ लाख रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यास भाग पाडले,

त्यावावत तक्रार दाखल होताच सायबर विभागाने तपास केला असता बाऊन्सर असलेल्या निकील नारायण माने (वय २४, तारची भाट, शिवोली) यांच्या शिवोली येथील बँक खात्यात ५ लाख जमा झाल्याचे व त्याने ते स्वतः चा चेक वापरून काढल्याचे दिसले. त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या खात्यात ही रक्कम विवेक गौतम यांच्या सांगण्यावरून जमा झाल्याचे सांगितले.

Online Fraud
NEET scam : ७०० विद्यार्थी...३०० कोटी रुपये गोळा करण्‍याचे 'टार्गेट'!

त्याने वापरली २० बैंक खाती

गौतम याची चौकशी करता तो रशिया आणि यू.के. मध्ये असल्याची माहिती मिळाली. पण सायबर विभाग त्याच्या पाळतीवर होता. तो भारतात परतताच त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान संशयिताने आपण सगळी रक्कम क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवून मग पुन्हा क्रिप्टो करन्सी विकून मिळालेली रक्कम परदेशी नागरिकांसह अनेकांच्या खात्यात जमा केल्याची कबुली दिली.

त्याने वापरली २० बैंक खाती

संशयिताने देशभरातील २० पेक्षा अधिक बँकांच्या खाती वापरली. त्यापैकी ९ बँक खाती गोठवण्यात आली तर उर्वरित खाती रायबंदर येथील सायबर क्राईम विभागाने गोठवली आहेत. रायबंदर येथील सायबर क्राईम विभागाचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news