Goa Court Rejects Bail | जीवघेणा हल्ला प्रकरणी संशयिताचा जामीन फेटाळला

Goa Court Rejects Bail | न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली.
Court
CourtFile Photo
Published on: 
Updated on: 

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
शिरो-करमणे येथे शेतीच्या वादातून गीता साळगावकर (६५) या महिलेवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणातील संशयित प्रभाकर शिरोडकर (८१) यांचा जामीन अर्ज मडगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश सुधीर शिरगावकर यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली.

Court
Goa Tourism Fraud | सावधान! गोव्यात 'टुरिस्ट गाईड' बनून पर्यटकांची लूट; सासष्टी परिसरात भामट्यांचा सुळसुळाट

गुन्ह्याचे गांभीर्य, हल्ल्याची पद्धत आणि तपासाची प्राथमिक अवस्था लक्षात घेता संशयिताला जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. कोलवा पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती.

भातशेतीच्या कापणीवरून तसेच जुन्या जमीनविषयक वादातून प्रभाकर शिरोडकर यांनी गीता साळगावकर यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून संशयिताला अटक केली होती.
जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी त्यांचे वय ८१ वर्षे असून ते वृद्ध आणि अशक्त असल्याचा युक्तिवाद केला.

Court
Goa Tourism Fraud | सावधान! गोव्यात 'टुरिस्ट गाईड' बनून पर्यटकांची लूट; सासष्टी परिसरात भामट्यांचा सुळसुळाट

हल्ल्यासाठी वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली असून, जखमी महिला उपचारानंतर घरी परतली आहे, असेही बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. संशयिताच्या मुलीने वडिलांची जबाबदारी स्वीकारण्याची आणि त्यांना पीडित महिला राहत असलेल्या गावापासून दूर ठेवण्याची तयारी दर्शवणारे प्रतिज्ञापत्रही सादर केले होते.

मात्र, सरकारी वकिलांनी जामीन अर्जाला विरोध केला. केवळ आरोपीचे वय जास्त आहे म्हणून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात जामीन देता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याचे नमूद केले. गुन्ह्याचे गांभीर्य आणि संभाव्य शिक्षेचा विचार करून न्यायालयाने प्रभाकर शिरोडकर यांचा जामीन अर्ज फेटाळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news