Goa Politics News | भाजपकडून जाणीवपूर्वक काँग्रेस कार्यकर्ते लक्ष्य

Goa Politics News | एससी सेलच्या राष्ट्रीय समन्वयक अश्विनी खोब्रागडे यांचा आरोप
Goa Politics News
Goa Politics News
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

भाजपकडून विरोधकांतील चांगल्या आणि जनतेसाठी काम करणाऱ्या नेत्यांवर अन्याय केला जात असून, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक अश्विनी खोब्रागडे यांनी केला. पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खोब्रागडे यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष अशा कारवायांना घाबरणार नाही.

Goa Politics News
Sal Gadotsav 2026 | साळमध्ये भक्तीचा उत्साह! तीन रात्री चालणाऱ्या गडेत्सवासाठी पंचायतीची जय्यत तयारी

अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण केले जाईल. सत्ताधारी पक्षाविरोधात ठामपणे भूमिका मांडणाच्या आणि जनहिताचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांवर खोटे आरोप लावून गुन्हे दाखल केले जात आहेत.

काही नेत्यांना बनावट प्रकरणांत अडकवून तुरुंगात टाकले जात असून, हा प्रकार लोकशाहीस घातक आहे, असा दावाही त्यांनी केला. COMMITTEE ST य प्रदेश त्या पुढे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षातील तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना दबावाखाली आणण्यासाठी केंद्रीय व राज्यस्तरीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे.

Goa Politics News
Mirabag Goa Protest | लढा गावाच्या अस्तित्वाचा, मान परंपरेचा! मिराबागेत आंदोलनाच्या आगीतही पेटली संस्कृतीची 'चूल'

सत्तेचा वापर सूडबुद्धीने केला जात असून, यामुळे जनतेच्या आवाजाला दाबण्याचा प्रयन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोव्यातील एससी समाजाला जात प्रमाणपत्र देताना त्यावर तात्पुरते असा उल्लेख केला जात आहे. त्यामुळे समाज बांधवांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अन्य समाजांप्रमाणेच कायमस्वरूपी जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या एससी विभागाचे अध्यक्ष विठू मोरजकर यांनी केली.

मोरजकर म्हणाले की, यापूर्वी एससी समाजातील व्यक्तींना मामलेदार कार्यालयातून जात प्रमाणपत्र दिले जात होते. मामलेदार कायमस्वरूपी जात प्रमाणपत्र देत होते. त्यामुळे विद्यार्थी व अन्य समाजबांधवांना हेलपाटे मारावे लागत नव्हते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news