

साळ : पुढारी वृत्तसेवा
साळ येथील गडेत्सव मंगळवार, दि. ३ रोजी पासून सुरू होणार आहे. तीन रात्री चालणारा हा उत्सव पाहण्यासाठी प्रत्येक रात्री हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. भाविकांना कोणतीही अडचण उद्भवू नये, तसेच विविध प्रकारच्या व्यावसायिकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासन आणि देवस्थान समिती विविध योजना अंतर्गत कामकाजावर नजर ठेवून आहे.
त्यात विज, नळाचे पाणी, वाहतूक शिस्त, साफसफाई, दुकाने थाटण्याची जागा याबाबतीत उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी, डिचोली मामलेदार दिनी साळ पंचायतीला कळविले. त्यानुसार सदर कामकाजाची पाहणी करण्यास सरपंच नीता राऊत यांनी भेट दिली. यावेळी होळी परिसर, दुकाने थाटण्याची जागा, रस्त्याच्या दुतर्फा कोणी दुकाने थाटलीत काय याचीही पाहणी सरपंच यांनी केली. संपूर्ण साफसफाईची जबाबदारी साळ पंचायतीने घेतली आहे.