Mallikarjun Kharge Goa | आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी; खरगे यांच्या दौऱ्यावेळच्या घटनेवरून वाद

Mallikarjun Kharge Goa | काळ्या झेंड्यांवरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली
Mallikarjun Kharge
मल्लिकार्जुन खर्गे File Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा नुकताच गोवा दौरा झाला. मात्र त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या काळ्या झेंड्यांवरून काँग्रेस व भाजपमध्ये जुंपली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरू झाल्या आहेत.

Mallikarjun Kharge
ST Political Reservation | "एसटी राजकीय आरक्षणासाठी 13 ऑगस्टला 'चलो पणजी'! 'उटा' संघटनेचा सरकारला थेट इशारा"

दिल्लीत खरगे यांच्यासह सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी १५ ऑगस्ट रोजी 'वंदे मातरम्'चा अपमान केल्याच्या मुद्द्यावरून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दि. १७ रोजी खरगे दाबोळी विमानतळाबाहेर येताच त्यांना काळे झेंडे दाखवले होते. त्यावरून बुधवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते अ‍ॅड. अमित पालेकर यांनी खरगे हे ज्येष्ठ आहेत, त्यांना काळे झेंडे दाखवणे चुकीचे असल्याचे सांगत भाजपचे नवे मुख्यालय हे 'चंदा चोरी महल' असल्याची टीका केली.

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करून अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार केळकर यांनी अमित पालेकर यांना जशास तसे उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाब दौऱ्यावर असताना व तिथे काँग्रेसचे सरकार असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना दोन तास अडवले होते.

याची आठवण करून दिली. त्याचबरोबर लोकशाहीमध्ये आंदोलन करणे चुकीचे नाही, असा दावा केला. सोमवारी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते शांततेने आंदोलन करत होते. मात्र काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर विविध वस्तू फेकल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पुढे येऊन काळे झेंडे दाखवले, असा दावा केळकर यांनी केला.

...तर नेत्यांना काळे झेंडे दाखवू : केळकर

काँग्रेस 'वंदे मातरम्' या राष्ट्रगानाचा वारंवार अपमान करून राजकारण करत आहे. त्यामुळेच मल्लिकार्जुन खरगे यांना गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने काळे झेंडे दाखवले. काँग्रेस नेत्यांनी 'वंदे मातरम्'चा पुन्हा अपमान केल्यास त्यांनाही काळे झेंडे दाखवू, असा इशारा भाजयुमोचे अध्यक्ष तुषार केळकर यांनी दिला.

'वंदे मातरम्' म्हणायचे असेल तर नव्या कायद्यानुसार पूर्ण म्हणा किंवा वाजवा, न पेक्षा म्हणूच नका, असे सांगून त्याचा अपमान केल्यास काँग्रेस नेत्यांना पुढेही काळे झेंडे आम्ही दाखवत राहू, असा इशारा केळकर यांनी यावेळी दिला. भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीस व पणजीच्या नगरसेविका अ‍ॅड. करीना शिरोडकर यांनी काँग्रेसची पत्रकार परिषद ही निराश लोकांचा कांगावा असल्याची टीका केली.

भाजप कार्यालय हे केवळ पक्षाचे कार्यालय नाही, हे जनतेचे कार्यालय आहे. प्रत्येक गोवेकराचे तिथे स्वागत आहे. शासकीय सेवा, ऑनलाइन सहाय्य आणि शासकीय कार्यपद्धतींसाठीचे सहकार्य, हे सर्व उपलब्ध असेल. कारण कार्यालय हे अंतिमत: लोकांसाठी आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Mallikarjun Kharge
Viresh Borkar Revolutionary Goans | वीरेश बोरकरांकडून पणजी कार्यालय ताबा; वाद चिघळण्याची शक्यता

भाजयुमोच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा : पालेकर

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या गोवा दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी खरगे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निदानप्रयत्न केला. त्याचा आम्ही निषेध करत असून, या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अमित पालेकर यांनी केली असून, तसे न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. खरगे हे विमानतळावरून निघाले असता भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यांनी विमानतळाच्या आतील भागात प्रवेश केला व कायदा मोडलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल होण्याची गरज असल्याचे पणजी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत पालेकर यांनी सांगितले.
खरगे हे गोव्याचे राज्य अतिथी, तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत अतिसुरक्षित क्षेत्रात आंदोलकांना प्रवेश कसा मिळाला, असा सवाल पालेकर यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news