

पैंगीण : पुढारी वृत्तसेवा
कला व संस्कृतीमंत्री रमेश तवडकर यांनी श्रीस्थळ-काणकोणचे जैवविविधता समितीचे अध्यक्ष विनय तुबकी व सदस्य शिरीष पै यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.
यावेळी श्रीस्थळ औद्योगिक वसाहतींमधील टाकीतील मळी बाहेर सोडण्याचे सुरू असलेले प्रकार त्वरित थांबवून प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेऊन मळी हलविण्याची मागणी केली.
श्रीस्थळ जैवविविधता समितीने दिलेल्या निवेदनावर चर्चा करून प्रदूषण रोखण्यासाठी मळी हलविण्याची योग्य व्यवस्था करेपर्यंत या ठिकाणी सुरू असलेले कंपनीचे काम बंद करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.