Government Polytechnic | डिचोली शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 1.4 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक 'एनर्जी फॉर गुड टेक्नॉलॉजी सेंटर'चे उद्घाटन

Government Polytechnic | मुख्यमंत्री : डिचोली शासकीय तंत्रनिकेतनमध्ये १.४ कोटी खर्चून अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन
Government Polytechnic
Government Polytechnic
Published on: 
Updated on: 

डिचोली : पुढारी वृत्तसेवा
आजच्या प्रगत व आधुनिक युगात तांत्रिक शिक्षणावर देणे काळाची गरज आहे. उद्योग क्षेत्रामध्ये आज या शिक्षण व प्रशिक्षणाची मोठी गरज ओळखून सरकारने टाटा कंपनीच्या सहाय्याने सर्व शासकीय प्रशिक्षण केंद्रांमध्ये औद्योगिक प्रशिक्षणाला प्रारंभ केला आहे. त्याचप्रमाणे सर्व शासकीय तंत्रनिकेतनामध्येही खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून अद्यावत औद्योगिक प्रशिक्षण शिक्षणाला सुरुवात केली जाणार आहे.

Government Polytechnic
Bicholim Bus Stand | डिचोली बसस्थानकाचे मे मध्ये होणार उद्घाटन

त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
डिचोली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कंपनीच्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत १.४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक 'एनर्जी फॉर गुड टेक्नॉलॉजी सेंटर'च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

या सोहळ्यास व्यासपीठावर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर, शासकीय पॉलिटेक्निक डिचोलीच्या प्राचार्या डॉ. प्रमोदिनी एस. नाईक, सीमेन्स इंडिया लिमिटेडच्या स्वतंत्र संचालिका स्वाती साळगावकर, कंपनीचे कार्यकारी संचालक व मुख्य वित्तीय अधिकारी हरीश शेखर तसेच मनुष्यबळ व संघटना विभागाच्या उपाध्यक्ष व सामाजिक दायित्व विभागाच्या प्रमुख बीना दीक्षित यांची उपस्थिती होती.

उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांच्यात रोजगार क्षमता वाढीस लावण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे २०० विद्यार्थ्यांना आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देता यावे यासाठी केंद्रातील शिक्षकांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले.

गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण

उद्योग क्षेत्र आधुनिक तंत्रज्ञानाना वेगाने स्वीकार करत असताना शैक्षणिक संस्था त्या तुलनेत मागे पडत आहेत. अशा अत्याधुनिक प्रयोगशालांच्या स्थापनेमुळे शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील ही दरी कमी होण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षण मिळू शकेल, असे सांगण्यात आले.

Government Polytechnic
Bicholim Municipality | राष्ट्रीय दिनी गैरहजर नगरसेवकाचा महिन्याचा पगार कापणार; डिचोली पालिकेचा ऐतिहासिक ठराव

औद्योगिक कार्यपद्धतींचे प्रशिक्षण देणार

उभारण्यात आलेल्या केंद्रामध्ये आधुनिक प्रयोगशाला सुविधा, उद्योग क्षेत्राशी सुसंगत अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्ये विकसित केली जाणार आहेत.

यामध्ये ऊर्जा क्षेत्र, हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅट्रिक्स, मेकाट्रॉनिक्स, सेन्सर्स तंत्रज्ञान, संगणकाच्या साहाय्याने रचना तयार करणे, तसेच विविध औद्योगिक कार्यपद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय गुणवत्ता व्यवस्थापन, उत्पादनक्षमता वाढविण्याच्या पद्धती, पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा यांचा अभ्यासक्रमात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news