

पणजी : पुढारी वृत्तसेवा
डिचोली बसस्थानकाचे काम २०२२ पासून सुरू आहे, एरवी ते दोन वर्षांमध्ये पूर्ण मात्र चार वर्षे होत आली तरी अद्याप या बसस्थानकाचे काम अपूर्ण आहे, ते त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केली.
प्रमोद सावंत करायचे होते. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येत्या चार महिन्यांमध्ये सर्व काम पूर्ण करून मे महिन्यामध्ये या बसस्थानकाचे उद्घाटन करण्याचे आश्वासन डॉ. चंद्रकांत शेट्ये यांना दिले.
शून्य प्रहारमध्ये आमदार विजय सरदेसाई यांनी मडगाव पालिकेने सोपो कर २० रुपयांवरून ५० रुपये केल्याचा मुद्दा उपस्थित करुन तो पुन्हा २० रुपये करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तुम्ही आणि मंत्री दिगंबर कामत मिळून ही समस्या सोडवा, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी करत या विषयाला पूर्णविराम दिला.