केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी मुख्यमंत्र्यांची वीज, गृहनिर्माणावर चर्चा

नीती आयोग बैठक व एनडीए मेळाव्यातही सहभाग
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी चर्चा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी चर्चा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
Published on
Updated on

Chief Minister Discusses Power and Housing Issues with Union Minister Manohar Lal Khattar

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या नवी दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी बुधवारी केंद्रीय गृहनिर्माण, शहरी व्यवहार व ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली. या भेटीत गोव्यातील विजेच्या समस्यांसह गृहनिर्माण व शहरी विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

डॉ. सावंत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे गोव्यातील गृहनिर्माण, शहरी विकास आणि नागरिकांसह पायाभूत प्रकल्पांना गती मिळत आहे. अर्बन चॅलेंज निधी अंतर्गत गोवा सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळावी, यासाठी खट्टर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत नीती आयोगाच्या ११व्या नियामक परिषदेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर, मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एनडीए आघाडीच्या बैठकीतही सावंत सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी चर्चा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
मान्सूनला देश व्यापण्यासाठी लागतात 38 दिवस

केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांचीही घेतली भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री किशन रेड्डी गंगापुरम यांची भेट घेतली. राज्याची अर्थव्यवस्था आणि त्यावर अवलंबून असलेल्या लोकांची उपजीविका मजबूत करण्यासाठी गोव्याच्या खाण क्षेत्रातील सुधारणांना केंद्राचा पाठिंबा आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. डॉ. सावंत यांनी खासदार मनोज तिवारी यांचीही भेट घेतली.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी चर्चा करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
Goa Electricity Bill Hike Protest | वीज बिल वाढल्याने सामान्य ग्राहकांचे मोडले कंबरडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news