

धावे : पुढारी वृत्तसेवा
चोर्ला घाटातून शहाळ्यांची कर्नाटकातून वाहतूक करणाऱ्या एका महिंद्रा बोलेरो पिकअप कर्नाटकातील पासिंगची (केए ३४ सी ५१६७) या गाडीला घाटात वळणाचा अंदाज न आल्याने अपघातग्रस्त झाली. यात गाडीने पलटी होऊन तिने पेट घेतला.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत वाहन जळून खाक झाले. मंगळवारी पहाटेच्या ४ वाजता ही घटना घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी घाटात धुके पसरले होते.
माहिती अग्निशामक दलाला दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी लागलीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, या घटनेमध्ये एकूण ५ लाखांचे नुकसान झालेले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यामध्ये भरपूर प्रमाणात पर्यटक आलेले आहेत त्यामुळे शहाळ्यांना मोठी मागणी आहे.
स्थानिक शहाळी नारळ रानटी माकडे शहाळी खाऊन फस्त करीत असल्यामुळे संपूर्णपणे कर्नाटकातील शहाळ्यावरच विक्रेत्यांना अवलंबून राहावे लागते. ही गाडी कर्नाटक मधून गोव्यात शहाळी घेऊन जात होती.
शहाळी रस्त्यावर पडून व आग लागून गाडीचे ५ लाख रुपये नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या कृष्णा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक नाईक, सुधाकर गावकर, साईनाथ सावंत, फटी कलमीश्कर यांनी या आग आटोक्यात आणली.