

मांडवी व म्हापसा नद्यांच्या गाळातून तयार झालेले चोडण बेट प्राचीन काळी ‘चडामणी / चड्डामणी’ नावाने ओळखले जात होते.
चोडण बेटावर डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य असून ते स्थलांतरित पक्षी, खारफुटीची जंगले व जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे.
मासेमारी, बोटबांधणी व सुवर्णकारागिरी हे येथील पारंपरिक व्यवसाय असून चोडणचे सुवर्णकार आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत.
कदंब राजा षष्टदेवाच्या काळात चोडण हे ‘महाक्षेत्र चड्डामणी’ म्हणून तीर्थस्थळ होते आणि त्याचा ऐतिहासिक वारसा आजही जपला गेला आहे.
-देवता अजित उमर्ये
एका बाजूला मांडवी नदी आणि दुसऱ्या बाजूला म्हापसा नदी यांनी आणलेल्या गाळापासनू निर्माण झालेले चोडण बेट. याला प्राचीन काळापासून 'चडामणी' नावाने ओळखले जायचे. चोडण गावची अशी ओळख पहिल्यांदाच प्रा. राजेंद्र केरकर यांनी परिक्रमेवेळी करून दिली. राज्याच्या राजधानी पणजीच्या पूर्वेस हे गाव वसलेले आहे. येथील फेरी सेवा चोडण बेटाला पणजी शहराशी जोडते. चोडण बेटावर डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आहे. ज्याचे नाव प्रसिद्ध भारतीय पक्षी शास्त्रज्ञ यांच्या नावावर आहे. हे अभयारण्य समृद्ध पक्षी जीवन आणि खारफुटीच्या वनस्पतीसाठी ओळखले जाते.
पक्षी निरीक्षक आणि नि सर्गप्रेमींसाठी हे एक आश्रयस्थान आहे. चोडण बेटावरील पक्षी अभयारण्य अंदाजे १.७८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापते आणि वन्य व स्थलांतरीत पक्षांसह विविध पक्षांच्या प्रजातींसाठी ओळखले जाते. पक्षी अभयारण्य असण्याबरोबरच चोडण वेट हे विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी आणि सागरी जीवनासह जवैविविधतने समृद्ध आहे. या बेटावर विस्तीर्ण खारफुटींची जंगले आहेत.
चोडण बेटावर मासेमारी करणारी लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. ते पर्यटकांना गोव्याच्या पारंपरिक जीवनशैलीची झलक देतात. येथील स्थानिक लोकांसाठी मासेमारी हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या गावातील सुवर्णकारही जगप्रसिद्ध आहेत. त्यांना पोर्तुगाल, अरब देशांत खूप मागणी आहे. एक सुवर्ण कारागीर होता, त्याचा पोर्तुगालला सत्कार करण्यात आला होता. येथील भडारी समाज हा बोट बांधण्यात अव्वल होता.
या बेटावर काही जुनी मंदिरे आणि पारंपरिक घरेदेखील आहेत. चोडण बेट येथील शांत वातावरणासाठी ओळखले जाते. चोडण, आवंाडी, काराय या तीन गावांचे मिळून चडुमणी बनलेले असावे. तीन गाव मिळून २१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात हे बेट विस्तारलेले आहे. याच्या चारही बाजूंनी पाणी आहे, तर मयेच्या बाजूने तिखाजन येथे पूल बांधून जोडले गेले आहे.
कदंब राजा शष्टदेवाच्या कालखंडात 'चड्डामणी' चडु म्हणजे मुकुट आणि त्यावर मणी म्हणून 'चडुमणी'. त्याकाळी चोडण हे एक तीर्थस्थळ होते आणि ते 'महाक्षेत्र चड्डामणी' म्हणून प्रसिद्ध होते. षष्ठदेव द्वितीय हेमल्लिनाथ देवाचे भक्त होते. ते आपल्या यशाचे श्रेय मल्लिनाथ देवाला द्यायचे. आज मल्लिनाथ मदिं दिर फोंड्यातील वरगाव या गावात पहावयास मिळते. षष्टदेवाने 'महामडं लेश्वर' असे नाव धारण केले होते.
सेंट बार्थोलोम्यू चर्च
चोडण बेटावर कारे व आंबाडी गावांच्या मधोमध हे चर्च आहे. हे चर्च सेंट बार्थोलोम्यू यांना समर्पित केले आहे. जे येशूच्या १२ प्रेक्षितांपैकी एक होते. हे चर्च १५ व्या शतकातील पोर्तुगीजकालीन वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. हे एक रोमन कॅथलिक चर्च आहे. आंबाडी : पासो-द-आंबाडी हा भाग पोर्तुगीज वसाहत व ब्राह्मण समाज यांचे मिश्रदृश्य प्रकट करतो. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे तसेच येथील मासेमारी करणारे लोक सेंट पीटरचा सांगोड साजरा करतात. कारे व आंबाडी या गावांना स्लीपिंग व्हिलेजेस म्हणून ओळखले जात असे. कारण पोर्तुगीजकाळी हे गाव आराम करण्यासाठी उत्तम, शांत व नैसर्गिक वातावरण प्रदान करायचे. चोडण हे बेट विविध प्रजातींच्या वनस्पती प्राणी आणि सागरी जीवनासह जैविविधतेने समृद्ध आहे. या बेटावर विस्तीर्ण खारफुटींची जंगले आहेत. एक महसूली गाव म्हणून तिसवाडी तालकुयातील सर्वाधिक मोठे भौगोलिक क्षेत्रफळ लाभलेला गाव म्हणून चोडण गावाची ओळख आहे. १९८८ साली गोवा सरकारने वैविध्यपूर्ण कांदळ वनस्पतीच्या प्रजातींचे वैभव मिरवणाऱ्या या गावातल्या १.७८ चौरस किलोमीटर क्षेत्राला डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणून अधिसूचित केले. एका बाजूला मांडवी आणि तिच्या खाड्या तर दुसऱ्या बाजूला म्हापसा नदीच्या पाण्याने या बेटाला वेढले आहे. वादळी वारे, मुसळधार पाऊस आदी नैसर्गिक प्रकोपाला सामोऱ्या जात खारफुटीची इथली जंगले चोडण सारख्या बेटाला सुरक्षा प्रदान करतात. मांडवी मुखावरती वसलेले हे खारफुटीचे वैभव टिकवले तरच आपला गाव तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला समर्थपणे सामोरा जाऊ शकतो आणि याची जाणीव असल्याने या कांदळवणाचे संवर्धन आणि संरक्षण करणेही काळाची गरज आहे.
चाफेश्वर
त्या ठिकाणी पवित्र आत्मा असल्याचे सांगितले जाते. चाफ्याच्या झाडाला धार्मिक महत्त्व आहे. वेताळाची लाकडी मूर्ती बनवण्यासाठी चाफ्याचे लाकूड वापरले जाते. आपल्या संस्कृतीत पूर्वीपासनूच झाडांना, शेतांना देवाच्या नावाने राखून ठेवण्याची परंपरा आहे. ज्याला काही ठिकाणी 'नमस' असेदेखील म्हणतात.
चॅपेल सेंट जेरोनीमस
हे चॅपेल गोलाकार आहे. १६ शतकातील हे चॅपेल कॉम्प्रो म्हणनू ओळखले जाते. हे चॅपेल सेंट जेरोनीमस यांना समर्पि तर्पि आहे. हे चॅपेल तत्कालीन चोडण सेमिनरीचा एक भाग होते. जिथे अध्यात्म धर्मशास्त्र शिकवले जात असे. आज आपल्याला पाहायला मिळतो तो फक्त त्या सेमिनरीचा (रोमन कॅथलिक विद्यालयाचा) एक भाग आहे. १५१० ते १५६१ दरम्यान पोर्तुगीजांनी हे बेट काबीज केले होते आणि चड्मणी या बेटाला आणि सरदारांचे बेट असे नाव दिले. मिशनरीजना प्रशिक्षण देण्याचे हे एक केंद्र होते. इथे अनेक वि षय शिकवले जायचे. या सेमिनारीला चर्च व घड्याळ टॉवरही होता आणि घंटा वाजायची तिचा आवाज संपूर्ण गावात ऐकू यायचा. फक्त इथे काही प्रमाणात या सेमिनारीचे अवशषे बाकी आहेत. १८५९ मध्येही सेमिनारी बंद करण्यात आली आणि येथील सामान राशोल सेमिनारमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. आसपासच्या जंगलाब किंदळ झाडे भरपरू प्रमाणात सापडतात. जी फुलल्यावर हिवाळा ऋतूची चाहूल लागते.
फिरंगेवस
या ठिकाणी पिंपळ कुळातील झाड आहे आणि त्याच्यावर फिरंगेवस नावाची दैवी शक्ती किंवा आपण म्हणू शकतो लोकदैवत असल्याचे सांगितले जाते. अशी दैवीशक्ती या धक्क्यावर असल्याने इथे कधीच जीवितहानी झाली नाही किंवा कोणी पाण्यात बुडाले नाही, असा लोकांचा विश्वास आहे. इथे फिरणारी दैवीशक्ती ही लोकांना पोर्तुगीजांप्रमाणेडोक्यावर हॅट घालून, हातात काठी घेतलेल्या स्वरूपात दिसते. म्हणनू तिला फिरंगेवस असे म्हणतात. लोक आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी फिरंगेवस येथे मंडोळी केळी व उंडे प्रकार अर्पण करतात.
सुळाचो मार
इतिहासकाऱ्यांच्या मते येथील दगड हा मंदिराचा खांब असावा. कारण त्याच्यावर काही प्रमाणात कोरीवकाम केलेले आढळते. पी. पी. शिरोडकर यांनी याचा उल्लेख महापाषाण म्हणून केला आहे. मात्र, या ठिकाणी अनेक मंदिरे ज्याप्रकारे उद्ध्वस्त केली गेली आहेत याचा अंदाज घेता तो दगड हा एखाद्या मंदिराचा खांब असावा असेवाटते. ज्याची कालांतराने लोकांनी पूजा करण्यास सुरुवात केली.
श्री देवकी कृष्ण मंदिर
चोडण गावची ग्रामदेवी श्री देवकी कृष्ण मंदिर आहे. मुख्य देवता देवकी-कृष्ण आणि त्यांच्याशी संबंधित भूमिका देवी, मल्लिनाथ, चंद्रेश्वर, लक्ष्मी रवळनाथ, कात्यायनी, चोडणेश्वर आणि धाडा शंकर यांना डिचोली मधील मयेवाड्यात नेण्यात आले आणि नंतर त्यांना सध्याच्या मार्शेल येथील स्थळी हलवण्यात आले. देवकी कृष्ण मंदिराची स्थापना मार्शल येथे १८४२ मध्ये करण्यात आली. गावात सातेरी देवीचे मंदिर देखील आहे. श्री चाफेश्वराच्या ठिकाणी धाल्याचा मांड आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांच्या धार्मिक छळामुळे चोडण बेटावरील अनेक हिंदू मंदिरे नष्ट करण्यात आली. आपल्या आराध्य दैवतांचे संरक्षण करण्यासाठी येथील स्थानिक लोकांनी मूर्ती प्रथम मये येथे आणि नंतर मार्शेल येथे हलवण्यात आल्या. त्यामुळे आज चोडण येथे श्री चाफेश्वर देवतेचे मूळ स्थान असले तरी मुख्य उत्सव मार्शेल येथे साजरा होतो. १ जानेवारी १९३४ रोजी श्री देवकी कृष्ण, भूमिका, मल्लिनाथाच्या मंदिराची पुनर्बाधणी चोडण येथे करण्यात आली. या रमणीय गावाविषयीची आणखी एक गोष्ट म्हणजे ते शि क्षणाचे केंद्र देखील होते. एकेकाळी बनारसच्या विद्यापीठाशी संलग्न असलेली विद्यापीठाची एक शाखा येथे अस्तित्वात होती. संस्कृत आणि प्राचीन साहित्याचे अध्यापन करणारे शि क्षणाचे स्वतःचे केंद्र होते.