Mining Dispute | गोव्यातील खनिज साठ्याला वझरेत विरोध

Mining Dispute | रस्त्यासाठी सरकारी जमिनीत अतिक्रमण; लोहखनिज उचलून नेण्यास ७ रोजीची डेडलाईन
Mining Dispute
Mining Dispute
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

लोह खनिजाची साठवणूक व वाहतूक करणाऱ्या गोव्यातील व्यक्तींकडून सिंधुदुर्ग सीमेवरील वझरे (ता. दोडामार्ग) येथे सरकारी जमिनीत अतिक्रमण करण्यात आले आहे. याला ग्रामस्थांनी आक्षेप घेत साठवलेले खनिज शनिवार, दि. ७फेब्रुवारीपर्यंत हलवावे आणि पुन्हा गावात हा व्यवसाय करू नये, अशी भूमिका मांडली. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

Mining Dispute
Burch Night Club Fire Case | बडतर्फ सचिव बागकरला 12 दिवस न्यायालयीन कोठडी

महसूल विभागाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. दरम्यान, संबंधित व्यावसायिक शेट्टी यांनी प्लॉटवर येत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निकालानंतर म्हणजे ७ फेब्रुवारीनंतर साठवण्यात आलेले खनिज उचलून नेण्याची तयारी दर्शविली. तोपर्यंत या प्लॉटवर खनिज आणून साठवण्याचे, उपलब्ध साठ्यापासून लंपी (खनिजयुक्त दगडाचे छोटे तुकडे) व खनिज पावडर वेगळे करण्याचे काम थांबवण्याची विनंती गावकऱ्यांनी केली.

त्याला शेट्टी यांनी सहमती दर्शवली व आपण प्लॉटवर येण्याचा रस्ता कागदपत्रात दाखवल्याप्रमाणे न काढता सरकारी जमिनीत अतिक्रमण करून काढल्याचे मान्य केले. या प्रकाराबद्दल स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून महसूलच्या कारभारावर संशय व्यक्त केला. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांवर तत्कालीन तहसीलदार मोरेश्वर हाडके आणि महसूल नायब तहसीलदार एन. एन. देसाई यांच्या सह्या आहेत.

पणजी येथे राहणारे शेट्टी यांनी आपण दवर्ली मडगाव येथे राहणाऱ्या मयेकर नावाच्या व्यक्तीच्या नावे खनिजासंदर्भातील कागदपत्रे बनवली असल्याचे यावेळी सांगितले. त्यांच्या वाळपई येथील पर्यवेक्षकाने कागदपत्रे दाखवली. मात्र, त्यात असलेल्या अनेक तांत्रिक त्रुटीबाबत ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. यावेळी शेट्टी यांनी आपला व्यवसाय कायदेशीर असल्याचे सांगितले.

मात्र, स्थानिकांनी आपला व्यवसाय कायदेशीर असो वा बेकायदेशीर, आमच्या गावात खनिज नको, असा पवित्रा घेतला. कळणे खनिज प्रकल्पातून वझरेमध्ये खनिज वाहतूक करण्याचे पत्रही त्यांनी यावेळी दाखवले. मात्र, सध्या तो प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाही, जवळपास बंदच आहे. त्यामुळे त्या पत्राच्या जोरावर ते व्यावसायिक इतर ठिकाणाहून दुय्यम दर्जाचे खनिज आणून चांगले व दुय्यम दर्जाचे खनिज मिक्स करून मध्यम ग्रेडचे खनिज तयार करून विकत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Mining Dispute
Chimbel Unity Mall Protest | चिंबल प्रकल्प स्थलांतराचा निर्णय; तरीही पर्यावरण रक्षणासाठी आज पणजीत जाहीर सभा

यावेळी वझरे गिरोडेचे माजी सरपंच विष्णू उर्फ सागर नाईक, लक्ष्मण गवस, चंद्रकांत नाईक, समीर पर्येकर, विकास गावडे, बाळा उर्फ बंटी शिरोडकर, शिवम गवस, तुषार गवस, अजय गवस, श्रीपाद गवस, अर्जुन गवस, अक्षय गावडे, कृष्णा म्हावसकर, संजय गवस, नारायण गवस, साईप्रसाद घाडी, शिवा गवस, आशिष हरवाळकर, कृष्णा काळकेकर, अविनाश काळकेकर, शुभम काळकेकर, नकुल काळकेकर, उल्हास पर्येकर, अभिषेक खोत, विष्णू पर्येकर, लक्ष्मण शिंगाडी, अविनाश म्हाळसेकर, संदेश म्हाळसेकर, योगेश खोत यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

ना हरकत दाखल्यालाही आक्षेप

वझरे सरपंचांनी या व्यावसायिकांना दिलेल्या ना हरकत दाखल्यालाही गावकऱ्यांनी आक्षेप घेतला. आपल्याला विश्वासात न घेता दाखला दिला आहे, त्यामुळे ग्रामसभेत तो रद्द करण्याचा ठराव घेण्यात येईल, असे सांगितले. तसेच याबद्दल सरपंचांना ग्रामपंचायीत, ग्रामसभेत जाव विचारण्याचा निर्णय घेतला.

हॉस्पेट व रेडीला मालाची वाहतूक

वझरेतील सीएनजी पंपासमोर हा प्लॉट आहे. या प्लॉटवर या व्यावसायिकाकडून खनिज पावडर आणि लंपी वेगवेगळी करून हॉस्पेट (कर्नाटक) व रेडी येथे पाठवली जाते. प्लॉटवर सध्या वजनकाटा उभारण्याचे कामही सुरू आहे. याचा अर्थ त्यांना आणखी काही वर्षे इथूनच व्यवसाय सुरू ठेवायचा आहे असे दिसते. आतापर्यंत कित्येक टन लोहखनिजाची वाहतूक डंपरमधून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news