

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष, युवा राजकीय नेतृत्व व सामाजिक कार्यात अग्रेसर चैतन्य मानकर यांनी मकर संक्रांतीच्या पावन दिनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घडवून आणले.
डिचोली येथील केशव सेवा साधनाच्या अंतर्गत नारायण झांट्ये विशेष मुलांच्या शाळेला भेट देत तेथील विद्यार्थ्यांना त्यांनी १७५ जर्सीचे वितरण केले. एकोप्याची, समतेची व सामाजिक संवेदनशीलतेची जाणीव अधिक दृढ करणारा हा उपक्रम उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमास शाळेचे व्यवस्थापक मकरंद कामत, मुख्याध्यापिका संजना प्रभुदेसाई, शाळेचे अध्यक्ष सागर शेट्ये, शिक्षक धीरज सावंत व मंजिरी जोग यांची उपस्थित होते. विशेष मुलांच्या विकासासाठी ते सातत्याने करत असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मानकर यांनी नमूद केले.
अशा उपक्रमांमुळे समाजात करुणा, सहानुभूती वृद्धिंगत होऊन सकारात्मक सामाजिक परिवर्तनास चालना मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
विशेष विद्यार्थ्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप : मानकर यावेळी कार्यक्रमात चैतन्य मानकर म्हणाले की, समाजात सर्वांना समान न्याय्य आणि हक्क असले पाहिजेत. त्यामुळे गरजू, दुर्लक्षित व वंचित घटकांसाठी नेहमीच मदतीसाठी मी तत्पर आहे. जर विशेष विद्यार्थ्यांबाबत बोलायचे तर त्यांच्यातील प्रतिभा आणि सुप्त गुण वाखाणण्याजोगे असतात, यात शंका नाही. त्यामुळे विशेष मुलांच्या पाठीवर प्रेमाची आणि कौतुकाची थाप देण्यासाठीच आम्ही हा उपक्रम राबवला.