Goa Mhadei Issue- शिवकुमार यांच्यासमोर 'म्हादई'चा विषय का नाही, भाजपचा प्रश्न

काँग्रेसचा व्यवहार दुतोंडी असल्याचा आरोप
पणजी: भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रमुख प्रवक्ते व आमदार दाजी साळकर. सोबत माध्यम प्रमुख सिद्धेश नाईक व रमेश घाडी
पणजी: भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रमुख प्रवक्ते व आमदार दाजी साळकर. सोबत माध्यम प्रमुख सिद्धेश नाईक व रमेश घाडी
Published on: 
Updated on: 

पणजी : गोवा काँग्रेसचा व्यवहार दुतोंडी आहे. गोव्यात म्हादई विकली, म्हादई संकटात म्हणून ओरड करणाऱ्या काँग्रेसने कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या समोर म्हादईचा विषय का उपस्थित केला नाही, असे प्रश्न गोवा भाजपने उपस्थित केला.

पणजी: भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रमुख प्रवक्ते व आमदार दाजी साळकर. सोबत माध्यम प्रमुख सिद्धेश नाईक व रमेश घाडी
Goa municipal elections | निवडणूक नगरपालिका अधिसूचना १९ फेब्रुवारीला

भाजपच्या मुख्यालयात अटल भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते व आमदार दाजी साळकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यावेळी भाजपचे माध्यम प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश नाईक व उत्तर गोवा सचिव रमेश घाडी उपस्थित होते.

पणजी: भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रमुख प्रवक्ते व आमदार दाजी साळकर. सोबत माध्यम प्रमुख सिद्धेश नाईक व रमेश घाडी
AAP Goa announcements-आपकडून गोव्यासाठी सहा मोठ्या घोषणा

साळकर म्हणाले की, कर्नाटक गोव्यातील तिकडे येणारे पाणी वळवत आहे, या प्रश्नावर गोव्यामध्ये काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आहे, आंदोलने करत आहे. मात्र त्याच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना राखण यात्रेला बोलावते, पण म्हादईचे पाणी वळवू नका म्हणून सुचनाही करत नाही, हा काँग्रेसचा दुतोंडीपणा असल्याचे सांगून शिवकुमार यांच्यावर अनेक गुन्हे आहेत, ते गुन्हे काँग्रेसला मान्य आहेत का, त्यांनी त्यांच्या भावाना मते न देणाऱ्या लोकांना मुलभूत गरजा पाणी आदी देण्यास नाकार दिला होता. गोव्यात काँग्रेस तेच करणार का, असे प्रश्न साळकर यांनी उपस्थित केले.

शिवकुमार यांनी गोव्यात भाजप

सरकारला काँग्रेस सरकार पर्याय असल्याचे म्हटले. कर्नाटकातील काँग्रेस सरकारला कंत्राटदारांचे ३८ हजार कोटी थकबाकी देणे जमत नाही, तेथील प्रति व्यक्तीवर एक लाख १२ हजार रुपये कर्ज आहे. पेपरफुटी प्रकरणी कारवाई केलेली नाही, एसी एसटी कल्याण निधीचे ११ हजार ८९६ कोटी इतरत्र शिवकुमार यांनी वळवून एस सी व एसटीवर अन्याय केला. तोच कित्ता गोव्यात काँग्रेस गिरवणार का, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, असे शिवकुमार यांच्यावर १९ गुन्हे असल्याचे साळकर यांनी सांगितले. कर्नाटकात गणेशोत्सव मिरवणूक बंद पडणारे काँग्रेस सरकार मताचे राजकारण करत असल्याचे साळकर म्हणाले.

सिद्धेश नाईक यांनी, अनेक गुन्हे दाखल असलेल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आदर्श समोर ठेवणारे गोव्याचे काँग्रेस नेते सध्या नेतृत्वहिन झाले असल्याचे सांगितले.

केजरीवाल यांच्या निवडणूक घोषणा

अरविंद केजरीवाल घोषणा करण्यात पटाईत आहेत; पण जिंकल्यानंतर त्या पूर्ण करत नाहीत. पंजाबमध्ये त्यांनी केलेल्या घोषणा पूर्ण केलेल्या नाहीत. तशाच निवडणूक घोषणा त्यांनी आज गोव्यात केल्या आहेत. भाजप ज्या घोषणा करते त्या पूर्ण करते. त्यामुळे केजरीवाल यांच्या घोषणावर कुणी विश्वास ठेवणार नाही, अशी प्रतिक्रिया साळकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news