Goa Election Result 2025 | भाजपच नंबर वन; गोव्यात जिल्हा पंचायतींवर वर्चस्व कायम

Goa Election Result 2025 | २९ जागांवर विजय; मगोप तीन, तर काँग्रेसला १० जागा
Goa Election
Goa Election
Published on
Updated on

पणजी : युद्धारी वृत्तसेवा

राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपला बहुमत प्राप्त इझाले असून उत्तर गोल्याग्रह दक्षिण गोव्यात भाजपने २०२० बी पुनरावृत्ती केली आहे. यावेळी भाजप-मगोष युतीने ४३ जागा लवकल्या होत्या, यात उत्तरेत १८, तर दक्षिणेत ११ अशा २९ जागांवर विजय मिळविला आहे.

Goa Election
Goa Election Result 2025 | नगरगावमधून भाजपचे प्रेमनाथ दळवी विजयी

काँग्रेसने उत्तरेत दोन तर दक्षिणेत ८, मगोप उत्तरेत १, दक्षिणेत २, आरजीने उत्तरेत दोन जागांवर विजय मिळविला आहे. गोवा फॉरवर्ड च आपने खाते खोलाले असून प्रत्येकी एक, तर राज्यात चार अपक्षांनी विजय मिळविला आहे.

जि. २. निवडणुकीत उला गोल्ल्यात कमिसने इकदोणा न हिस्स या दोन जागा जिंकल्या, तर आरजी पक्षाने सांताक्रुज व सेंट लॉरेन्सची जागा जिंकली. उतर गोव्यात कोलवाळ व हरमल या दोन जागा अपक्षांनी पुन्हा पटकावल्या. दक्षिण गोव्यात सासष्टी तालुक्यात काँग्रेस यशस्वी ठरली असली तरी इतर मतदारसंघांत त्यांना तेवढेसे यश मिळाले नाही.

खोलाची जागा काँग्रेसने व रायची जागा गोवा फॉरवर्डने जिंकली. मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्यासह आमदार गोविंद गावडे व उल्हास तुयेकर यांच्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी दोन्ही जागा विरोधकांना मिळाल्याने या तिन्ही नेत्यांसाठी तो धक्का मानला जात आहे.

प्रियोळ मतदारसंघात येणारी वेलिंगची जागा मगोने जिंकली आहे. तसेच बेतकी खांडोळात मगोचा समर्थक अपक्ष उमेदवार निवडून आल्याने गावडे यांच्यासाठी तो धक्का मानला जात आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील एकूण १५ केंद्रांवर तालुक्याच्या ठिकाणी त्या-त्या तलुक्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली होती.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ

खोर्ली मतदारसंघाकडे बऱ्याच जणांचे लक्ष होते. उत्तर गोव्याची माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या मतदारसंघातून गोवा फॉरवर्डने अगोदरच कृष्णा परब यांना उमेदवारी जाहीर केली होती.

मात्र काँग्रेसही मागे हटण्यास तयार नसल्याने या मतदारसंघात मैत्रिपूर्ण लढत झाली. काँग्रेसतर्फे ग्लेन काब्राल यांना उमेदवारी देण्यात आली होती. या मैत्रिपूर्ण लढतीमुळे खोर्लीत सिद्धेश नाईक यांचा विजय सहज शक्य झाला. सिद्धेश यांना ५५९४ मते मिळाली तर विरोधी मित्रांची एकत्रित मते ९२७५ एवढी आहेत.

Goa Election
Goa Election Result | केरीतून भाजपचे नीलेश परवार यांना ऐतिहासिक आघाडी

बाबूची जादू चालली नाही

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीतील तोरसे मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार राघोबा कांबळी यांच्या विरोधात पेडण्याचे माजी आमदार आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी प्रदीप कांबळी या उमेदवाराला मैदानात उतरवले होते.

भाजपचा उमेदवार थिवीत राहतो असा मुद्दा बाबूनी उपस्थित केला होता. मात्र भाजपचे राघोबा कांबळीच या मतदारसंघात विजयी ठरले. बाबूच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तोरसेत बाबूची जादू चालली नाही असे लोक म्हणतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news