

नगरगाव: पुढारी वृत्तसेवा
केरी पंचायत निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश प्राप्त केलेली आहे. भाजपाचे उमेदवार नीलेश परबार यांनी १२१२८ मतांची आघाडी घेऊन या ठिकाणी विजयी होण्याचा मान मिळविला. त्यांनी विरोधकाबर मात करून मिळविलेल्या यशाबदल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे च आमदार डॉ. देविया राणे यांनी अभिनंदन केले आहे.
केरी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपतर्फे नीलेश परवार काँग्रेस पक्षातर्फे आयुष्य केरकर आम आदमी पक्षातर्फे नाथसो जाधव उमेदवार रिंगणात होते. या पंचायतीमध्ये एकूण चार ग्रामपंचायतीचा समावेश आहे. केरी, मोर्ले म्हाऊस व ठाणे या चार ग्रामपंचायतीतून सर्वच मतदान केंद्रामधून भाजपाला साठल्याने आघाडी मिळाली.
वाळपई कदंबा बस स्थानकांच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीमध्ये भाजपाला सुमारे ६ हजार पेक्षा जास्त महांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या फेरीमध्ये ही आघाडी कायम राखत निलेश परवार यांनी विजय संपादन केला.
प्राप्त माहितीनुसार नीलेश परचार यांना १३.२६४ काँग्रेस पक्षाचे आयुष्य केरकर यांना १,१३६ तर आप पक्षाचे नालाचे जाधव यांना फक्त ४५७ महावर समाधान मानाने लागले. निवडणूक अधिकारी प्रतीक परब गांनी निवडणुकीचा निकाल पोषित केला. यावेळी त्यांनी विजयी उमेदवार निलेश परवार पांग्रा निजगी पत्र सुपूर्द केले.
हा विकासाचा कौल भाजपच्या या याच्याबद्दल समर्थकांनी जल्लोष फरून आनंद साजरा केला यावेळी त्यांच्यासोबत आमदार डॉ. देविया राणे यांची उपस्थिती होती त्यांनी यावेळी जनतेने प्रामाणिकपणाने कौल दिलेला आहे. हा कौल म्हणाने विकासाचा आहे. येणाऱ्या काळात विकासाच्या बाबतीत जबाबदारी वाढलेली आहे. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात वेदील, असे सांगितले.
केरी जिल्हा पंचायत निवडणूक भाजप नीलेश परवार (विजयी)-१३,२६४
काँग्रेस-आयुष्य केरकर-११३६
आप नवसो जाधव-४५७मताधिक्य-१२,१२८