Babush Monserrate | रोहित आमदार व्हावा ही माझी इच्छा : बाबूश

Babush Monserrate | पणजीचा पुढील महापौर कोण होईल हे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उघड केले नसले तरी आपला पुत्र रोहित याने २०२७ मध्ये आमदार व्हावे ही आपली इच्छा असल्याचे मत त्यांनी एका खासगी चॅनलशी बोलताना व्यक्त केले.
Panjim Babush Monserrate
Panjim Babush Monserrate
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजीचा पुढील महापौर कोण होईल हे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उघड केले नसले तरी आपला पुत्र रोहित याने २०२७ मध्ये आमदार व्हावे ही आपली इच्छा असल्याचे मत त्यांनी एका खासगी चॅनलशी बोलताना व्यक्त केले.

Panjim Babush Monserrate
Goa Illegal Casino | मांडवीतील कॅसिनोंत विनापरवाना जुगार

महापौरपदाच्या प्रश्नावर ते म्हणाले की माझ्याशी चर्चा करून पक्ष काय तो अंतिम निर्णय घेईल. मनोहर पर्रीकर हे स्टेटसमन होते. ते पणजीत असेपर्यंत आपण कधी पणजीतून लढायचा विचारही केला नाही.

कारण आपण त्यांच्याविरुद्ध जिंकू शकणार नाही हे मला माहीत होते. उत्पल पर्रीकर यांनी नुसती बाबूशविरोधात आघाडी उघडण्यापेक्षा पक्षात यावे. मनोहर पर्रीकर यांचा वारसा जपावा. पक्षाने त्यांना पणजीत उमेदवारी द्यायचा निर्णय घेतला तरी माझे काही म्हणणे नाही. कॅसिनोच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की विरोधक फक्त आरोप करतात. त्यांच्याकडे तोडगा नाही.

Panjim Babush Monserrate
Goa Politics 2026 | अडीच हजार मतांचा पाठिंबा वाढला

२०२७साली त्यांचे लीज संपेल तेव्हा मूळ कराराप्रमाणे कंपन्यांनी खोल समुद्रात जावे असा निर्णय सरकारने घ्यायला हवा, असे ते म्हणाले.

न्यायालयीन निर्णयाची वाट पाहूया

३९ए या टीसीपीतील वादग्रस्त कलमाबद्दल विचारले असता बाबूश म्हणाले की प्रत्येक गोष्ट रस्त्यावर उतरून होणार नाही. ही कायदा दुरुस्ती विधानसभेत संमत झाली आहे. त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आपण न्यायालयीन निर्णयाची वाट पाहूया. प्रत्येकाने न्यायालयाचा आदर केला पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news