Goa Illegal Casino | मांडवीतील कॅसिनोंत विनापरवाना जुगार

Goa Illegal Casino | सुदीप ताम्हणकर यांची पोलिसांत तक्रार
Casinos
Casinos
Published on
Updated on

पणजी: मांडवी नदीतील कॅसिनो जहाजांनी जवळपास २२ महिने अधिकृत सरकारी अधिसूचना नसताना अवैधरीत्या जुगार व्यवसाय चालविल्याचा गंभीर आरोप आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी केला आहे.

Casinos
Panaji Mayor Selection 2026 | पणजीचा नवा 'कारभारी' कोण? बाबूश मोन्सेरात यांच्या मनात काय? महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष

पणजी पोलिस स्थानकात तक्रार करून त्याबद्दल गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधित कॅसिनो कंपन्यांच्या संचालक मंडळांसह गेमिंग कमिशनर यांच्यावर या तक्रारीत ठपका ठेवण्यात आला आहे.

मांडवी नदीतील कॅसिनो जहाजांना व्यवसायाची परवानगी देणारी शेवटची सरकारी अधिसूचना १० जानेवारी २०२३ रोजी जारी झाली होती. या अधिसूचनेनुसार कॅसिनो व्यवसायाची वैधता केवळ ३१ मार्च २०२३ पर्यंतच होती. त्यानंतर पुढील अधिसूचना २३ जानेवारी २०२५ पर्यंत जारी करण्यात आली नाही.

Casinos
South Goa Gas Shortage 2026 | दक्षिण गोव्याला गॅस टंचाईचा विळखा! मडगावात सिलिंडरसाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा

त्यामुळे एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत जवळपास २२ महिने कॅसिनो जहाजांवर जुगार व्यवसाय कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय सुरू होता, असा आरोप त्यांनी केला आहे. ताम्हणकर यांनी आरोप केला आहे की, कॅसिनो कंपन्यांनी जाणीवपूर्वक परवानगी नसताना व्यवसाय सुरू ठेवला आणि या कालावधीत शेकडो कोटी रुपयांचे बेकायदेशीर उत्पन्न मिळवले.

या तक्रारीत पोलिसांना कॅसिनो कंपन्या आणि गेमिंग कमिशनर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची, जहाजांच्या नोंदींची चौकशी करण्याची आणि बेकायदेशीर जुगारातून मिळवलेल्या उत्पन्नाची जप्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news