Panaji Atal Setu Traffic Jam | अटल सेतू एक्झिट रॅम्प दुरुस्तीमुळे मेरशी सर्कल परिसरात वाहतूक कोंडी

Panaji Atal Setu Traffic Jam | पणजीजवळील अटल सेतूच्या एक्झिट रॅम्पवर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे मेरशी सर्कल परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Mumbai Traffic Jam
Mumbai Traffic JamPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजीजवळील अटल सेतूच्या एक्झिट रॅम्पवर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे मेरशी सर्कल परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नियमित मार्ग बंद करण्यात आल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असून, त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

Mumbai Traffic Jam
Parli Traffic Jam : परळीत उड्डाणपुलावर पुन्हा वाहतूक कोंडी

सोमवार दि. २२ जूनपासून ते २५ जूनपर्यंत रॅम्प बंद असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. मात्र, अनेक वाहन चालकांना या बदललेल्या मार्गाची पुरेशी माहिती नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. विशेषतः बाहेरगावाहून येणारे वाहन चालक आणि पर्यटक चुकीच्या दिशेने वळण घेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पर्यायी मार्ग शोधताना काही चालक धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

Mumbai Traffic Jam
Goa Parvari traffic jam- पर्वरीत वाहतुकीची जीवघेणी कोंड

वाहतूक कोंडीमुळे कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवासी यांना मोठा फटका बसत आहे. अनेकांना नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ लागत असून, इंधनाचा अपव्ययही होत आहे. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना प्रवासापूर्वी पर्यायी मार्गाची माहिती घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वेग मर्यादेचे भान ठेवावे आणि चुकीच्या दिशेने वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news