Arvind Kejriwal Goa | फोंड्याच्या समस्या भाजप सोडवू शकत नाही

Arvind Kejriwal Goa | अरविंद केजरीवाल : केवळ प्रामाणिक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे कारस्थानच करू शकते
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal File photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

फोंड्यात कचऱ्याचे ढीग, कुर्टी भागात अस्वच्छ सांडपाणी, तुंबलेली गटारे आणि खराब पायाभूत सुविधा हे गंभीर प्रश्न आहेत. या मूलभूत समस्यांकडे लक्ष देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असून, जनतेच्या प्रश्नांऐवजी राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यावर भर दिला जात आहे, 'जर त्यांना वाटत असेल की ते मला राजकारणातून संपवू शकतात, तर त्यासाठी त्यांना मला मारावे लागेल किंवा माझ्यापेक्षा अधिक प्रामाणिक काम करून दाखवावे लागेल कारण मी जिवंत असेपर्यंत प्रामाणिक राजकारणासाठी आणि जनतेसाठी लढत राहणार आहे.

Arvind Kejriwal
Illegal Constructions Goa | बेकायदा आस्थापनांवरील कारवाईची माहिती द्या

असा विश्वास आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला. आप गोवा युनिटने पणजीत आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा खोट्या दारू धोरण प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर भव्य सत्कार सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमाला राज्यभरातून पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी केजरीवाल बोलत होते. यावेळी सीसीपी निवडणुकीत विजय मिळवणारे आपचे पहिले नगरसेवक जंक सुखिजा तसेच जिल्हा पंचायत निवडणुकीत विजयी झालेले अँटोनियो लिआओ फर्नाडिस यांचाही सत्कार करण्यात आला. केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले आणि हा संपूर्ण प्रसंग आपसाठी 'अग्रिपरीक्षा' असल्याचे सांगितले.

१०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले, मात्र कोणताही पुरावा सापडला नाही आणि ६०० पानी न्यायालयीन आदेशातही खटला चालवण्यासाठी पुरेसा आधार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यांनी नमूद केले की मनिष सिसोदिया यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना अनेक महिने तुरुंगात ठेवण्यात आले, तरीही कोणीही दोषी आढळले नाही.

आपचा वाढता प्रभाव थांबवण्यासाठी भाजप नेतृत्वाने हा मोठा राजकीय कट रचला. सत्ता, पैसा आणि केंद्रीय यंत्रणा असूनही भाजप आपला राजकीय पराभव करू शकला नाही, म्हणून बदनामी आणि अटकांचा मार्ग अवलंबला. त्यांनी सांगितले की, दिल्ली आणि पंजाबमधील शिक्षण, आरोग्य, मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक यांसारख्या कामांमुळे आपची राजकारणाची नवी दिशा भाजपसाठी आव्हान ठरली आणि त्यामुळे पक्षाला दडपण्याचा प्रयत्न झाला.

Arvind Kejriwal
Sambhajinagar women and child hospital: चारशे बेडचे शिशू रुग्णालयाचे काम पूर्ण होऊनही लटकले

आप आमदार क्रूझ सिल्वा यांनी सांगितले की, सत्याला उशीर होऊ शकतो, पण ते कधीही दडपले जाऊ शकत नाही. हा निकाल भाजपच्या प्रचाराला जोरदार उत्तर असून, स्वच्छ आणि जबाबदार प्रशासनासाठी आपच्या विचारसरणीभोवती लोकांनी एकत्र यावे, असे त्यांनी आवाहन केले.

आमदार वेन्झी व्हिएगस यांनी सांगितले की, भाजपने आपची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आणि सत्तेच्या आमिषाने नेत्यांना फोडण्याचाही प्रयत्न केला, तरी पक्ष एकजूट राहिला. आप भ्रष्टाचार उघड करत राहील आणि आरोग्य, शिक्षण व पायाभूत सुविधांवर आधारित पर्यायी विकास मॉडेल सादर करेल.

आपशी बदनामी करण्याचा डाव वाल्मिकी

आप गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांचा प्रवास एक प्रतिष्ठित आयआरएस पद सोडून भ्रष्टाचारविरोधी आंदोलन उभारणे आणि सुशासन देणे त्यांच्या प्रामाणिकतेचेप्रमाण आहे. गोव्याला या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न हा आपची बदनामी करण्यासाठी होता, मात्र न्यायालयाच्या निर्णयाने हा कट उघड झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news