Sambhajinagar women and child hospital: चारशे बेडचे शिशू रुग्णालयाचे काम पूर्ण होऊनही लटकले

शासनाला पाझर फुटेना, तब्बल १८९ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा
Sambhajinagar women and child hospital
दूध डेअरीच्या पाच एकर जागेत ४०० खाटांच्या महिला व शिशू रुग्णालयाच्या सहा मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. (छाया: बाळू देशमुख)
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर: जालना रोडवरील दूध डेअरीच्या जागेतील ४०० खाटांच्या महिला व शिशू रुग्णालयाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. मात्र डेडलाईन उलटूनही कामे लांबल्याने १११ कोटी निधीचा खर्च वाढून तब्बल १८९ कोटींवर पोहोचला. याच सुधारित निधीच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यतेसाठी रुग्णालयाच्या इमारतीचे आरोग्य विभागाकडे हस्तांतरण लटकले आहे. शासनाला पाझर फुटत नसल्याने प्रसूती कळांनी विव्हळणाऱ्या गरोदर महिलांच्या वेदना कमी होऊन कधी नवजात शिशूच्या रडण्याचे आवाज कानी पडतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरातील दुग्ध प्रयोगशाळेच्या साडेपाच एकर जागेत महिला व शिशू रुग्णालयासाठी सहा मजली भव्य व प्रशस्त इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. २०२१ पासून हे काम सुरू असून, १९,२७२ चौ.मी. क्षेत्रात रुग्णालयाच्या सहा मजली मुख्य इमारतीसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी सहा मजली तीन इमारतींचे बांधकाम शंभर ट्कके पूर्ण झाले आहे.

Sambhajinagar women and child hospital
Chatrapati Sambhajinagar : पादचारी रस्त्याचा राजा फक्त कागदावरच

यात वाहन पार्किंगसह दुमजली इमारत उभारण्यात आली आहे. रंगरंगोटीनंतर आता विद्युतीकरणाचे काम ९० टक्के झाले आहे. दरम्यान, मार्च २०२५ पर्यंत रुग्णालयाच्या कामांची वाढीव मुदत होती. मात्र अनेकदा कामे लांबल्याने इमारतींचा खर्चही तब्बल ७८ कोटींनी वाढला. सुरुवातीला १११.२८ कोटींचा खर्च वाढून आता तब्बल १८९.६० कोटींच्या निधीचा सुधारित प्रस्ताव प्रशासकीय स्तरावर मान्यतेसाठी प्रलंबित आहे.

असे आहे महिला व शिशु रुग्णालय

रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत २०० खाटांचे अत्याधुनिक महिला रुग्णालय, प्रसूती कक्ष व उच्च जोखमीच्या गर्भधारणेसाठी विशेष उपचार विभाग, स्त्रीरोग, वंध्यत्व, कर्करोग तपासणीसाठी स्वतंत्र विभाग, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, ओ.पी.डी., एक्स-रे रेडिओलोजिस्ट, सोनोग्राफी ईसीजी रुम्स, पेडियाट्रिक्स वॉर्ड, शस्त्रक्रिया विभाग, विविध चाचण्यांचे लॅब सुविधा आहे. त्यावरील दोन मजल्यावर नवजात बालकांसाठी २०० खाटांचे एम.सी.एच. रुग्णालय आहे.

निधी अभावी रेंगाळले काम

सार्वजनिक आरोग्य विभागाने २० सप्टेंबर २०१९ रोजी या २०० खाटांच्या रुग्णालयाच्या सहा मजली इमारतीसाठी १११.८९ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. प्रत्यक्ष निविदा ८९.८३ कोटी रुपयांची मंजूर झाली. त्यानंतर २०० खाटांचे एम.सी.एच. रुग्णालयासाठी २६ कोटींचा निधी देण्यात आला. सुरुवातीला निधीसाठी रुग्णालयाचे काम रंगाळले होते. आता हाच खर्च तब्बल १८९ कोटींवर गेले आहे.

Sambhajinagar women and child hospital
Latur ZP budget 2026 : लातूर जिल्हा परिषदेचा ३७.७८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

महिला व बाल रुग्णालयासाठी वाढीव निधीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. लवकरच या रुग्णालयाचे आरोग्य विभागाकडे हस्तांतरण होईल. रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मितीही अंतिम टप्यात आहे.

डॉ. कांचन वानेरे, उपसंचालक, आरोग्य विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news