

हणजूण : पुढारी वृत्तसेवा
हणजूण पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका बोगस कॉलसेंटरचे रॅकेट उद्ध्वस्त केले. दि. २९ रोजी रात्री ही कारवाई ग्रँड चिवार, हणजूण येथील एका रिसॉर्टवर करण्यात आली. याप्रकरणी १५ संशयितांना अटक करून लॅपटॉप, मोबाईल फोन, राऊटर व इतर इलेक्ट्रॉनिक सामान मिळून सुमारे २५ लाखांचा ऐवज जप्त केला.
खबर मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक साहिल वारंग, उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर, कॉन्स्टेबल सत्येंद्र नास्नोडकर, कॉन्स्टेबल शाणू नाईक, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, कॉन्स्टेबल शाम पार्सेकर, कॉन्स्टेबल गुरु सांगेलकर, कॉन्स्टेबल निखिल, कॉन्स्टेबल रितेश महाले यांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
जितू शिवदास (वय २९, मालाड, मुंबई), तौहिद खान (३२, चेंबूर, मुंबई), प्रितेश उपाध्याय (२४, वाशी), सोहिल हबीब खान (५२, मालाड, मुंबई), विश्राम रोकडे (२५, मुंबई), इम्तियाज पठाण (३२, गोवंडी, मुंबई), शाहिद सय्यद (३६, गोवंडी, मुंबई), अनिकेत शर्मा (२७, वाशी, मुंबई), उर्मिष त्रिवेदी (२२, भाईंदर, मुंबई), साजिद खान (३१, दिल्ली), अरुण करकडा (२६, भाईंदर, मुंबई), ऋषिकेश सांडवे (२५, माहीम, मुंबई), इमरान अली सिद्दीकी (४१, भांडुप, मुंबई), श्रीकांत माळी (२६, ठाणे) आणि लोकेश सुवर्णा (२८, पनवेल) १५ संशयितांना अटक केली आहे.
६ दिवसांची पोलिस कोठडी
पोलिसांनी पंचनामा करून ऐवज जप्त केला तसेच संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१९, ३१८ (४), आर/डब्ल्यू ३(५) आणि ६६-सी, ६६-डी या माहिती तंत्रज्ञान कलमांखाली गुन्हा नोंद करून अटक केली. सर्व संशयितांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलिस कोठडी दिली असून हणजूण पोलिस पुढील तपास करीत आहेत.