Ratnagiri Crime : रत्नागिरीत ५२ किलो गोमांस जप्त; एकास अटक

उद्यमनगर परिसरात शहर पोलिसांची कारवाई; एकूण १.०६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
Ratnagiri Crime News
रत्नागिरीत ५२ किलो गोमांस जप्त; एकास अटक
Published on
Updated on

रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथून तब्बल ५२ किलो गोमांसाची वाहतूक करणाऱ्या एका संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत गोमांस, एक दुचाकी आणि डीप फ्रीझर असा एकूण १ लाख ६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २६ जून रोजी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी फणसवळे येथे गोवंशीय मांस आणि हाडे सापडल्याने शहरात गोमांसाची उघडपणे होत असलेली वाहतूक चर्चेचा विषय ठरली आहे. लियाकत शौकत दावत ( ४८, रा. लांजेकर नगर, उद्यमनगर, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश सावंत यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी संशयित आपल्या ताब्यातील ॲक्टिव्हा दुचाकी (एमएच-०८-एझेड-६४८५) वरून ५२ किलो गोमांस विक्रीसाठी वाहतूक करत असताना ही कारवाई करण्यात आली.

संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२५, महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ५(ब), ५(क), ९(अ) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ६६(१), १९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामूनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, महिला सहाय्यक पोलिस फौजदार स्वाती राणे, पोलिस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, गणेश सावंत, सत्यजित दरेकर आणि अतुल कांबळे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news