Goa Cyber Crime | सावधान! OLX वर ट्रेडमिल विकणे पडले महाग; हणजूणच्या तरुणाला 2.24 लाखांचा गंडा

Goa Cyber Crime | नागवा येथील नागरिकाला 2.24 लाखांचा चुना
Goa Cyber Crime
Goa Cyber Crime
Published on
Updated on

हणजूण:

ओएलएक्स वरील जाहिरातीवरून वस्तू विक्रीच्या मोहा पायी २ लाख २४ हजार रुपयांना गंडवला गेल्याची तक्रार रायन कोरिया (रा. फुलदेनवाडा, नागवा) याने हणजूण पोलिस स्थानकात दिली. हा प्रकार दि. २५ जानेवारी रोजी घडला होता.

Goa Cyber Crime
Sinnar News: सिन्नरचा पाणीपुरवठा तीन- चार दिवस बंद राहणार? कारण समोर

रायन कोरिया याने चालणे व धावण्यासाठी वापरात येणारे ट्रेडमिल मशीन विक्रीस असल्याची जाहिरात ओएलएक्स अॅप वर टाकली होती ही जाहिरात पाहून अज्ञात संशयिताने कोरिया यांच्याशी संपर्क साधला व नंतर त्याच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक शेअर करण्यास सांगितले. संशयिताने रायन याच्या बँक खात्यातून २ लाख २३ हजार ९९८ रु. आपल्या खात्यात हस्तांतरित करून घेतली.

Goa Cyber Crime
BITS Pilani Goa Student Deaths | बिट्स पिलानी कॅम्पस, 14 महिन्यांत 6 मृत्यू; 'युवा फॉरवर्ड'कडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

हणजूण पोलिसांकडे वर्ग

ही तक्रार नंतर ९ फेब्रुवारी रोजी हणजूण पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. हणजूण पोलिसांनी तक्रार नोंद करून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद केला. हणजूण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक नितेश शिंगाडी हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news