Amit Patkar | काँग्रेसमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर एकाकी; गोवा फॉरवर्डशी वाढल्या जवळीकीची चर्चा

Amit Patkar | गोवा फॉरवर्डशी होत असलेल्या वाढत्या जवळीकीची राजकीय चर्चा
Amit Patkar
अमित पाटकर
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडचडे मतदारसंघातील राजकारणात वेगाने बदल होताना दिसत आहे. एका बाजूला भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री निलेश काब्राल यांनी भाजपने उमेदवारी दिली तरी स्वीकारायची की नाही याचा विचार करावा लागेल, असे जाहीरपणे सांगत पक्षावरील नाराजी व्यक्त केली आहे.

Amit Patkar
Goa Rainfall Deficit | गोव्यात पावसाची दांडी! सर्वाधिक कमी पर्जन्यमानाच्या राज्यांमध्ये गोवा सहाव्या स्थानावर

दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे पराभूत उमेदवार आणि माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची गोवा फॉरवर्डशी वाढती जवळीक आणि तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे कुडचडेतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

अमित पाटकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर त्यांचे आणि काँग्रेसमधील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे संबंध बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र आता पाटकर गोवा फॉरवर्डच्या संपर्कात असून, विजय सरदेसाई यांच्याशी त्यांचे राजकीय सूर जुळू लागल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या कुडचडे काँग्रेसच्या बैठकीस अमित पाटकर यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.

या घटनेनंतर काँग्रेसमधील मतभेद आणखी ठळक झाल्याची चर्चा सुरू झाली.
विशेष म्हणजे, गोवा फॉरवर्डमधून बाहेर पडलेले दत्तराज राऊत देसाई यांनी सार्वजनिकपणे नाराजी व्यक्त करत, आगामी निवडणुकीत कुडचडे मतदारसंघातून अमित पाटकर यांनाच गोवा फॉरवर्डची उमेदवारी दिली जाणार असल्याचे वक्तव्य केले होते.

त्यांच्या या विधानामुळे गोवा फॉरवर्डमधील अंतर्गत नाराजीही समोर आली. प्रदेशाध्यक्ष पद गमावल्यानंतर अमित पाटकर सध्या पुन्हा कुडचडे मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांचा विशेष कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

Amit Patkar
Girish Chodankar Statement | "गोवा फर्स्ट नव्हे, गोवा लास्ट!" विजय सरदेसाई अन् 'आप'च्या आघाडीवर गिरीश चोडणकर यांचा प्रहार

कुडचडेत तिरंगी लढत शक्य

अमित पाटकर यांनी गोवा फॉरवर्डशी जवळीक साधल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीकडे लक्ष केंद्रित करून असलेले बाळकृष्ण होडारकर हे मात्र सक्रिय झाले आहेत. २०२७ च्या निवडणुकीत कुडचडेतील लढत तिरंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील काही महिन्यांत या घडामोडींना आणखी वेग येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता कुडचडे मतदारसंघाकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news