Girish Chodankar Statement | "गोवा फर्स्ट नव्हे, गोवा लास्ट!" विजय सरदेसाई अन् 'आप'च्या आघाडीवर गिरीश चोडणकर यांचा प्रहार

Girish Chodankar Statement | विश्वासघात केल्याचा आरोप : त्यांची शेवटची निवडणूक, त्यांना एकही जागा मिळणार नाही
Girish Chodankar Goa
Girish Chodankar Goa
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीसाठी गोवा फॉरवर्ड पक्ष आणि आपने केलेली आघाडी गोवा फर्स्ट नव्हे, तर गोवा लास्ट आहे. ही त्यांची शेवटची निवडणूक असून, त्यांना एकही जागा मिळणार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.

Girish Chodankar Goa
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

चोडणकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. चोडणकर म्हणाले की, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि आपची गोव्यात ताकद नाही. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात निवडणूक लढवावी, ही राज्यातील सामाजिक कार्यकर्ते, बिगर सरकारी संस्था (एनजीओ) यांची इच्छा होती.

यासाठी त्यांनी काँग्रेस, आरजीपी, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि आपकडे एकत्र येऊन आघाडी करावी आणि निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती. मात्र, आप आणि गोवा फॉरवर्ड गोमंतकीयांच्या विरोधात गेलेत. त्यामुळे त्यांची ही शेवटचीच निवडणूक ठरणार आहे, असा दावा त्यांनी केला.

चोडणकर म्हणाले की, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई गेले दोन-तीन महिने आमच्यावर सातत्याने टीका करतात. कधी सरदेसाई म्हणायचे की, आम्हाला दिल्लीचे हायकमांड नको, आम्हाला स्थानिक हवे. कधी म्हणायचे आमचा काँग्रेसवर विश्वास नाही. काँग्रेसचे आमदार फुटून गेले आणि आमचा घात केला.

आमच्यासाठी आम्हाला एकत्र या असे म्हणणारे गोमंतकीय मोठे आहेत. त्यांचा मान राखण्यासाठी सगळे सोसले, संयमही राखला. आम्ही त्यांच्यावर कधी टीका केली नाही.
चोडणकर यांनी सांगितले की, फातोर्डा मतदारसंघात चांगला उमेदवार द्यावा यासाठी अनेकांचे फोन आम्हाला येत आहेत.

Girish Chodankar Goa
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

अनेकांनी तर फ्रान्सिस सार्दिन, कॅ. व्हिरिएतो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची नावेही सुचविली आहेत. आमच्यावरील प्रेमापोटी आणि भाजप सत्तेपासून दूर जावे यासाठी आम्हाला एकत्र येण्याचा, चांगला उमेदवार देण्याचा आग्रह अनेकांनी धरला आहे.

लढणार ते जिंकण्यासाठीच

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, काँग्रेस जिंकण्यासाठीच फातोर्डामध्ये निवडणूक लढवेल. सरदेसाई यांना हरविण्यासाठी आम्ही निवडणूक लढणार नाही, तर जिंकण्यासाठी लढणार हे अगदी स्पष्ट आहे.

सरदेसाई नव्हे, भाजप काँग्रेसचा शत्रू!

चोडणकर म्हणाले, विजय सरदेसाई आमचे शत्रू नाहीत. आमचा शत्रू आहे तो भाजप. त्याला हरविण्यासाठी आम्ही फातोर्डामध्ये निवडणुकीच्या रिंणात उतरणार आहोत. यावेळी गोवा फॉरवर्ड आणि आप आम्हाला त्रास देताहेत असे वाटले, तर आम्ही त्यांच्याविरोधात शड्डू ठोकून उभे राहू; कारण आमचा मुद्दा स्पष्ट आहे की, ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठीच लढत आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news