Job Scam Goa | संशयित अजित शंखवाळकरच्या पत्नीचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Job Scam Goa | त्यावरील सुनावणी २६ ऑक्टोबरला ठेवली आहे.
job offer scam
job offer scamfile photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बनावट उत्पादन शुल्क आयुक्त नोकरी घोटाळा प्रकरणातील संशयित अजित शंखवाळकर याची पत्नी रुपाली शंखवाळकर हिने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने पणजी पोलिसांना दिले आहेत. त्यावरील सुनावणी २६ ऑक्टोबरला ठेवली आहे.

job offer scam
Water Supply Crisis | मिरामार येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने पणजी शहरात तीव्र पाणीटंचाई; स्थानिकांचे प्रचंड हाल

संशयित अजित शंखवाळकर याच्याविरुद्ध पणजी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधून माहिती देण्यास सांगितले होते.

दरम्यान, चौकशीसाठी त्याची पत्नी रुपाली शंखवाळकर हिला पोलिस स्थानकात उपस्थित राहण्याची नोटिस बजावण्यात आली होती. तिने हजेरी न लावता अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणात तिचाही समावेश आहे की काय, असा पोलिसांचा संशय बळावला आहे.

job offer scam
URPro Card Goa Digital | यूआरप्रो कार्डसाठी केवळ 5 टक्के जमीनमालकांकडून कागदपत्रे सादर; पणजी, मडगावमधील सर्वेक्षणाचे वृत्त

पणजी पोलिसांनी संशयित अजित शंखवाळकर याच्याविरुद्ध लूकआउट नोटिस जारी केली आहे. शेजारील राज्यात त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. सरकारी नोकरीची बनावट नियुक्तीपत्रे तसेच जमीन मालमत्तेची खोटी कागदपत्रे तयार करून तळेकर कुटुंबाची सुमारे १.२७ कोटींची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news