IFFI Goa 2026: एआयचा वाढता वापर चिंताजनक : इफ्फीमध्ये फ्रेंच चित्रपट निर्मात्या ज्युली बर्तुचेली यांचा इशारा

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या वापराबद्दल चिंता व्यक्त करताना फ्रेंच चित्रपट निर्मात्या ज्युली बर्तुचेली यांनी सर्जनशीलता, कॉपीराइट आणि पर्यावरणीय परिणामांविषयीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
Julie Bertuccelli
Julie BertuccelliFile Photo
Published on: 
Updated on: 

IFFI Goa 2026:

पणजी : भारत शिंदे

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या वापराबद्दल चिंता व्यक्त करताना फ्रेंच चित्रपट निर्मात्या ज्युली बर्तुचेली यांनी सर्जनशीलता, कॉपीराइट आणि पर्यावरणीय परिणामांविषयीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. विशेषतः पाण्याचा आणि विजेचा वापर चिंताजनक असल्याचे सांगितले. एआयवर अतिप्रमाणात अवलंबून राहिल्याने मानवी स्मरणशक्ती, स्वतंत्र विचार आणि सर्जनशीलतेतील अस्सलपणा यांवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

आपल्या गावातील अस्पृश्यता आणि पुरुषप्रधानता यांसारख्या संवेदनशील सामाजिक विषयांवर माहितीपट तयार करू इच्छिणाऱ्या एका युवा चित्रपट निर्मात्याला मार्गदर्शन करताना बर्तुचेली यांनी विश्वास आणि सातत्यपूर्ण संवादाचे महत्त्व स्पष्ट केले. चित्रपट निर्मात्यांनी ज्या समुदायाचे चित्रण करायचे आहे, त्यांच्याबद्दल प्रामाणिक आस्था दाखवली पाहिजे आणि आपल्या कामाचा उद्देश स्पष्टपणे सांगितला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

Julie Bertuccelli
IFFI Goa 2026: "विनोद हा आयुष्याकडे पाहण्याचा बुद्धिमान मार्ग"; स्पेनच्या ‘लुकिंग फॉर मायकल’चा इफ्फी ५७ मध्ये वर्ल्ड प्रीमियर

वास्तविक मानवी संवादातील उत्स्फूर्त भावना, शांतता, हावभाव आणि अपूर्णता यांचे चित्रण हे माहिती चित्रपटांचे प्रमुख मूल्य आहे. या वैशिष्ट्यपूर्ण मूल्यावर माहितीपट सादर होतात, जे कृत्रिम बुद्धिमत्ता पुनरुत्पादित करू शकत नाही, असे परखड मत ज्युली बर्तुचेली यांनी व्यक्त केले.

भारताच्या समृद्ध माहितीपट निर्मिती परंपरेचे केले कौतुक

माहितीपट निर्मितीविषयी आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन मांडताना बर्तुचेली यांनी फ्रान्समध्ये या चित्रपट प्रकाराला मिळणाऱ्या संस्थात्मक पाठबळाविषयी चर्चा केली. यामध्ये चित्रपटगृहांच्या तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाचा चित्रपट निर्मितीसाठी होणारा उपयोग आणि चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी संरक्षित कालावधीची भूमिका यांचा समावेश आहे. आगामी वर्षांमध्ये पॅरिसमध्ये भारतीय माहितीपटांचा पूर्वावलोकन महोत्सव आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. भारताच्या समृद्ध माहितीपट निर्मिती परंपरेचे त्यांनी कौतुक करायला त्या विसरल्या नाहीत.

एकंदरीत फ्रेंच चित्रपट निर्मात्या ज्युली बर्तुचेली यांनी समाजाशी नैतिकतेने जोडले जाणे, लोकांच्या विचारांवर चित्रपटांचा प्रभाव आणि मानवी सर्जनशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले. माहितीपट निर्मिती ही विश्वास, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारी जपणारी एक आत्मीय प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अर्थपूर्ण परिवर्तनाची क्षमता

माहितीपट निर्मिती ही विश्वास, नैतिक जबाबदारी आणि मानवी समज यांवर आधारित प्रक्रिया असल्याचे महत्त्वपूर्ण विचार समोर आले. तसेच दुर्लक्षित वास्तव समाजाच्या जाणिवेत आणून अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्याची चित्रपटांची कायमस्वरूपी क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित होण्यास मदत झाली.

Julie Bertuccelli
IFFI 2026 Girish Kasaravalli | चित्रपट कधीच अराजकीय नसतो! इफ्फीमध्ये गिरीश कासारवल्ली यांनी मांडली महत्त्वाची भूमिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.