Goa Lok Sabha Election Results 2024 : उत्तर गोव्याचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक करणार दुहेरी विक्रम

श्रीपाद नाईक करणार दुहेरी विक्रम
श्रीपाद नाईक करणार दुहेरी विक्रम

पणजी : पुढारी व्रुतसेवा उत्तर गोव्याचे विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री नाईक हे सलग सहाव्यांदा निवडून येऊन एक विक्रम करणार आहेत. पण त्याचबरोबर मतांच्या आघाडीचाही विक्रम ते नोंदवण्याच्या तयारीत आहेत. अद्यापही मतमोजणीच्या काही फेरी बाकी असल्या तरीही दुपारी १२.५९ वाजेपर्यंत भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांच्यावर १,०८११२ मतांची आघाडी घेतली होती.

श्रीपाद नाईक यांना २ लाख ४२ हजार २८८ मते मिळालेली असून, त्यांचे विरोधक काँग्रेसचे रमाकांत खलप यांना १ लाख ३४ हजार ३२७ मते प्राप्त झालेली आहेत. त्यामुळे जवळजवळ १ लाख ८ हजार ११२ मतांची आघाडी त्‍यांना प्राप्त झालेली आहे.

यापूर्वी श्रीपाद नाईक यानी २०१४ साली काँग्रेसचे रवी नाईक यांच्या विरोधात १ एक लाख ५ हजार ५९९ मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला होता. अद्यापही मतमोजणी बाकी असल्यामुळे श्रीपाद नाईक हे मतांच्या आघाडीचा आपलाच विक्रम यावेळी मोडीत काढतील हे स्पष्ट झालेले आहे. २०१४ साली श्रीपाद नाईक यांना २ लाख ६७ हजार ९०३ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे रवी नाईक यांना १ लाख ३२ हजार ३०४ मते मिळाली होती. अशा प्रकारे १ लाख ०५५९९ मतानी नाईक जिंकले होते.

२०१९ मध्ये श्रीपाद नाईक यांना २,४४,८४४ तर काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांना १,६४,५९७ मते प्राप्त झाली होती. २०१९ मध्ये श्रीपाद नाईक यांनी ८०,२४७ मताची आघाडी घेऊन विजय प्राप्त केला होता. मात्र यावेळी आघाडी १ लाख १० हजार पेक्षा जास्त मतांची होणार ते जवळजवळ निश्चित झालेले असून, सलग सहा वेळा निवडून येतानाच आघाडीमध्ये श्रीपाद नाईक विक्रम करणार आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news