Goa News : मॉडेलिंगचे आमिष दाखवून साळगावच्या महिलेची १४ लाखांची फसवणूक | पुढारी

Goa News : मॉडेलिंगचे आमिष दाखवून साळगावच्या महिलेची १४ लाखांची फसवणूक

प्रभाकर धुरी

पणजी: मॉडेलिंगचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो, भरपूर पैसा मिळेल, असे आमिष दाखवून आणि सोशल मीडियाचा वापर करत अज्ञाताने साळगाव येथील एका महिलेला १३ लाख ९८ हजार रुपयांचा गंडा घातला. आपल्याला मॉडेल म्हणून काम करण्याची संधी मिळेल आणि त्यातून भरपूर पैसाही कमावता येईल, या विचाराने त्या महिलेने जवळपास १४ लाख रुपये गुंतवले. पण फेसबुक मेसेंजर वापरणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीने तिची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी महिलेने सायबर क्राईम विभागाकडे धाव घेत तत्काळ तक्रार नोंदवली. Goa News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञाताने तक्रारदाराशी फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून संपर्क साधला. मॉडलिंगमध्ये रुची असल्यास टेलिग्राम लिंकद्वारे “किट्स मॉडेल अकादमी” चा ग्रुप जॉईंट होण्यास सांगितले गेले. त्यानंतर मॉडेलिंगशी संबंधित काम हवे असल्यास बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. दरम्यान, मॉडेलिंग काँट्रॅक्ट आणि इतर बाबींसाठी तब्बल १३ लाख ९८ हजार रुपये आपल्या आयसीआयसीआय बँकेच्या खाते क्रमांक- १३६२०१५०२७६१ आणि एचडीएफसी बँकेच्या खाते क्रमांक- ५०२००००४३७१८३२ मध्ये जमा करण्यास भाग पाडले. पोलिसांनी सर्व तपशीलांचा आढावा घेत अज्ञाताविरोधात आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांखाली विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास सायबर विभागाचे पोलिस निरीक्षक विकास देयकर करत आहेत. Goa News

हेही वाचा 

Back to top button