पुनश्च बरसो रे ! कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासाठी 48 तास पावसाचे | पुढारी

पुनश्च बरसो रे ! कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासाठी 48 तास पावसाचे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे तेथून राज्यावर बाष्पयुक्त वारे येत आहे. तर उत्तर भारतातून शीतलहरी सक्रीय होत आहेत. या दोन्ही वार्‍याची मध्यमहाराष्ट्रात टक्कर होत असल्याने हिवाळ्यात पावसाळा अनुभवायला मिळत आहे. असे वातावरण आगामी 48 तास कोकण, मध्यमहाराष्ट्र अन् काही प्रमाणात मराठवाड्यात राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रीय झाल्याने त्या भागात 4 ते 10 अंशावर तापमान आहे. काही भागात पाऊसही सुरु आहे. कश्मिर ते मध्य प्रदेशपर्यंत येलो अलर्ट आहे. महाराष्ट्रात मात्र फारसा पाऊस नाही. पुढे संपूर्ण दक्षिण भारतात येलो अलर्ट आहे. त्यामुळे उत्तर भारतातून शीत वारे तर अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वार्‍याची ट्क्कर मध्यमहाराष्ट्रावर होत असल्याने राज्यात सध्या पावसाळी वातावरण तयार झाले आहे.

12 जानेवारीनंतर कोरडे वातावरण…
मंगळवारी मध्यमहाराष्ट्र,कोकण व मराठवाड्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. मात्र किमान तापमानात घट नाही झाली. पाऊस अन् वारा यांच्या संगमातून गारठा सुटल्याने मंगळवारी अनेक भागात दिवसभर थंडी होती. असे वातावरण गोवा राज्यासह कोकण, मध्यमहाराष्ट्र, काही प्रमाणात मराठवाड्यात आगामी 48 तास राहिल.12 जानेवारीनंतर मात्र हे वातावरण निवळून कोरडे वातावरण राहिल त्यामुळे किमान तापमानात घट होईल. मात्र पारा 10 अंशाखाली जा़णार नाही.

राज्याचे मंगळवारचे किमान तापमान…
चंद्रपूर 14, पुणे 18.2, मुंबई 23, नगर 18.4, जळगाव 15.4, कोल्हापूर 21.9, महाबळेश्वर 15.4, मालेगाव 17.2, नाशिक 17.7, सांगली 22.2, सातारा 20.2, सोलापूर 21.3,धाराशिव 16.4, छत्रपती संभाजीनगर 16.2, परभणी 17, नांदेड 18.8, बीड 18, अकोला 16, चंद्रपूर 14 गोंदिया 14.4

संबंधित बातम्या
Back to top button