Goa News : ‘पेज थ्री’चे निर्माता, दिग्दर्शक शैलेंद्र सिंग यांनी केली ११ चित्रपटांची घोषणा | पुढारी

Goa News : 'पेज थ्री'चे निर्माता, दिग्दर्शक शैलेंद्र सिंग यांनी केली ११ चित्रपटांची घोषणा

प्रभाकर धुरी

पणजी : पेज थ्री, हनुमान (कार्टून फिल्म), ट्राफिक सिग्नल, फिराक, जन्नत, जेल, रश यासारखे उत्तमोत्तम चित्रपट देणाऱ्या लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता शैलेंद्र सिंग यांनी आपल्या आगामी ११ चित्रपटांची घोषणा केली. पत्र सूचना कार्यालयात त्यांनी बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली .यावेळी त्यांच्यासोबत आफ्रिका येथील सिने पार्टनर इयान बॉलेन उपस्थित होते.

चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्यांना,करु इच्छिणाऱ्यांना इफ्फी स्वप्ने देते, उडण्यासाठी पंख देते. आपण त्यासाठी सज्ज व्हायला हवे. चित्रपट म्हणजे कथा सांगणे. कथा सांगण्यासाठी चित्रपटांची निर्मिती करायला हवी. कथा छोटी असेल तर कमी लोक पाहतील, मोठी असेल तर अधिक लोक पाहतील, त्याहीपेक्षा मोठी असेल तर अख्खं जग पाहिलं. त्यामुळे आपण आपला आवाज वाढवण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी आपण पाकिस्तानी कलाकार घेऊन बनवलेल्या खुदा के लिये चित्रपटाची आठवण सांगितली. जर तुम्हाला चित्रपट बनवायचा असेल तर तो चांगल्या पद्धतीने डिझाईन करा असे त्यांनी सांगितले. चित्रपट कधीच एकट्याने पूर्ण होऊ शकत नाही. त्याला अनेकांचे सहकार्य लागते. जेव्हा हजारो लोक ५०० रुपये देऊन चित्रपट पाहतात, तेव्हा तेही त्या चित्रपटाचे भागधारक असतात. असेही सिंग यावेळी म्हणाले.

सिंग यांनी घोषित केलेले चित्रपट

शैलेंद्र सिंग यांनी प्लुगो, स्कॅवेंजर्स,डॉक्टर dang, लवर्स,स्टोरी ऑफ danil, सेक्सॅहोलिक, तिगडम, परफेक्ट डिवोर्स, खुद की खुशी, बॅटल ऑफ रुपीज ३४०,ब्रदर्स या अकरा चित्रपटांची घोषणा केली. आपण फिल्म बाजार मध्ये जाणार नाही.मी कलेचा पुजारी आहे. पैशांसाठी कला नाही;पण कलेतून पैसा मिळत असेल तर मला चालेल असेही शैलेंद्र सिंग म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button