Goa Crime : मडगाव हादरले, भर दिवसा घरात शिरून गुंडाचा गळा चिरून खून | पुढारी

Goa Crime : मडगाव हादरले, भर दिवसा घरात शिरून गुंडाचा गळा चिरून खून

मडगाव; पुढारी वृत्तसेवा फातोर्डात मजुराच्या खुनाचा गुंता सुटलेला नाही, तोच रूमडामळ दवर्ली परिसर पुन्हा एका क्रुप्रसिद्ध गुंडाचा भर दिवसात गळा चिरून खून झाल्‍याच्या घटनेने हा परिसर हादरून गेलेला आहे. मृताचे नाव सादिक बेल्लारी उर्फ लॉली (वय २३) असे आहे. एका खून प्रकरणात तो जामीनावर सुटला होता. मारेकऱ्यांनी थेट त्याच्या घरात घुसुन त्याला मारून टाकले आहे.

ही घटना आज (शुक्रवार) सकाळी घडली आहे. सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास बेल्लारी याचे आई वडील कामाला गेल्याची संधी साधुन मारेकरी घरात शिरले. खॉटवर तो झोपलेला असताना त्याच्या मानेवर सुऱ्याने सपासप वार करण्यात आले. बेल्लारी हा कारागृहातून नुकताच जमीनावर सुटला होता.

भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे हाऊसिंग बोर्ड परिसर पुन्हा हादरला आहे. बेल्लारी हा टाईल्स फिटर आहे. त्याला आणि इस्माईल मुल्ला उर्फ छोटू याला चंद्रावाडा येथील एका खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. पोटात सुरा खुपसून खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता.

हेही वाचा : 

Back to top button