पणजी, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. एस. साधुण्णावर यांच्या बैलहोंगल येथील बँकेवर गोवा इन्कम टॅक्स (आयटी) विभागाने छापा टाकला. दरम्यान, मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त केली आहेत. (Belgaum News)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील राणी चन्नम्मा सौदार्य को-ऑपरेटिव्ह बँक ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बिल्डर साधुण्णावर यांची आहे. ते या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. काल (दि. २) संध्याकाळच्या सत्रात गोव्यातील आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बँकेवर छापा टाकला. बँकेतील सर्व २६२ लॉकरची तपासणी केली. या छाप्यात आर्थिक व्यवहाराशी समंधीत कागदपत्रे जप्त केली आहेत. साधुण्णावर यांनी कोट्यवधीचा कर चुकवल्या प्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याचे आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Belgaum News : विरोधकांना हतबल करण्यासाठी छापा
दरम्यान, कर्नाटकामध्ये सध्या विधानसभा निवडणूक जाहीर झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा छापा टाकण्यात आल्यामुळे त्याला राजकीय वळण लागले आहे. केंद्र सरकार विविध एजन्सींचा वापर विरोधकांना हतबल करण्यासाठी करत आहे. हा छापा त्याच प्रकारातून टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. मात्र आयटी विभागाने बिल्डर असलेले व्ही. एस. साधुण्णावर यांनी कोट्यवधीचा कर चुकवला असल्याने त्यांच्या बँकेवर छापा टाकण्यात आल्याचे आयटीने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा