गोव्यातून पोलिस प्रशिक्षणासाठी दिल्लीला गेलेल्या दोघांना मारहाण, इस्पितळात दाखल | पुढारी

गोव्यातून पोलिस प्रशिक्षणासाठी दिल्लीला गेलेल्या दोघांना मारहाण, इस्पितळात दाखल

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : ना धड जेवण, प्यायला खारे पाणी आणि आजारी असून सुद्धा प्रशिक्षणाला जाण्याची सक्ती, अशा परिस्थितीमुळे गोव्यातून पोलिस प्रशिक्षणासाठी दिल्लीला गेलेल्या युवकांची स्थिती बिकट झाली आहे. यातील दोन जवानांना अत्यवस्थ अवस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसल्यामुळे गोव्यातून गेलेल्या पाचशे पोलिसांनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

पिण्यासाठी देण्यात आलेल्या पाण्यात किडे आढळले

गोवा पोलिस

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका जवानाच्या मानेवर प्रशिक्षकाने ठोसा लावल्याने त्याच्या मानेला दुखापत झाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याला गोव्यात पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. तर कुंदन या प्रशिक्षणार्थीला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्यामूळे त्याला कलन येथील राव तोला राम मेमोरियल इस्पितळात भरती करण्यात आले आहे. पोलीस भरतीची प्रक्रीया बऱ्याच महिन्यांपासून अडकून पडली होती. अखेर गेल्या आठवड्यात पाचशे पाचशे जणांना दिल्लीत प्रशिक्षणासाठी पाठवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानुसार दक्षिण आणि उत्तर गोव्यातून पाचशे पोलीस खास रेल्वेने दिल्लीला रवाना झाले आहेत. पण प्रशिक्षणाला सुरुवात होताच त्यांना कोणत्याही सुविधा देण्यात आल्या नाहीत. जेवणही दिले जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. एका जवानाने ‘दै पुढारी’ जवळ आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर बोलताना पिण्यासाठी खारे पाणी दिले जात असल्याचे सांगितले.

पाण्याच्या टाकी जवळ अस्वच्छता आहे…

गोवा पोलिस

प्रशिक्षणाच्या वेळी काही जण आजारी पडले होते. त्यांनी एका दिवसाच्या विश्रांतीची मुभा मागितली असता ती नाकारण्यात आली आणि त्यांना त्याच परिस्थितीत पुन्हा प्रशिक्षणासाठी रुजू होण्यास सांगितले. एकाने नकार दिल्याने त्याला मारहाणही करण्यात आली. या मारहाणीत मानेला जबर दुखापत झाल्याने त्याला इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शिवाय या घटनेची माहीती मिळताच गोव्यातून एक वरिष्ठ पोलीस अधिकारी दिल्लीला रवाना झाल्याचे समजते. संतप्त पोलिस प्रशिक्षणार्थी आज सुट्टीवर गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button