Digambar Kamat : ‘भाजपमध्ये येण्यापूर्वी देवाची परवानगी घेतली’, दिगंबर कामत यांचे अजब वक्तव्य

Digambar Kamat : ‘भाजपमध्ये येण्यापूर्वी देवाची परवानगी घेतली’, दिगंबर कामत यांचे अजब वक्तव्य

पणजी; पुढारी ऑनलाईन : गोव्यामध्ये अखेर अपेक्षेप्रमाणे राजकीय उलथापलथी घडल्या. काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठी खिंडार पडली आहे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पण, या प्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि त्यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांचे अजब वक्तव्य समोर आले आहे. विद्यमान आमदार व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले की, 'त्यांनी आणि बाकीच्या आमदारांनी भाजपमध्ये येण्यापूर्वी देवाची परवानगी घेतली आणि देवाने सहमती दर्शवली'.

आपला देवावर विश्वास असून निवडणुकीपूर्वी काँग्रेस न सोडण्याची शपथ घेतली होती हे खरे असल्याचे कबुल करत दिगंबर कामत (Digambar Kamat) म्हणाले. "मी पुन्हा मंदिरात गेलो आणि देवाला विचारले की काय करावे. देवाने मला सांगितले की तुमच्यासाठी जे चांगले आहे ते करा,"
फेब्रुवारीमध्ये, गोवा निवडणुकीच्या काही दिवस आधी, काँग्रेस उमेदवारांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रससोबत राहण्याची शपथ घेतली होती.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्यासह काँग्रेसच्या आठ आमदारांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. यासह ४० सदस्य संख्या असणाऱ्या गोवा विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ तीनवर आले आहे. मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवून आपली सत्ता कायम राखली. भाजपकडे यापूर्वी २० आमदार होते. आता काँग्रेसच्या आमदारांची संख्या ११ वरून तीनवर आली आहे.

काँग्रेसमधील अकरापैकी आठ आमदारांनी बुधवारी सकाळी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पणजी येथील भारतीय भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये दाखल होऊन रीतसर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सरचिटणीस दामोदर नाईक, ॲड. नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष बाबू कवळेकर यांच्यासह काँग्रेस सोडलेले आठ आमदार उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी दिगंबर कामत, मायकल लोबो आलेक्स सिक्वेरा व काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदारांना पुष्पगुच्छ देऊन भाजपमध्ये स्वागत केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news