Trees In Goa : गोव्यात ३ लाख ८१ हजार ३८५ वृक्षसंपदा; वन खात्याची गणना

Trees In Goa : गोव्यात ३ लाख ८१ हजार ३८५ वृक्षसंपदा; वन खात्याची गणना
Published on
Updated on

पणजी; गायत्री हळर्णकर : गोव्यातील उत्तरेत 1,32,243 आणि दक्षिण जिल्ह्यात 2,49,142 अशी मिळून 30 एप्रिल 2023 पर्यंत राज्यात एकूण 3,81,385 झाडे असल्याचे वन खात्याने स्पष्ट केले आहे. लिव्हिंग हेरिटेज फाऊंडेशन या संस्थेने 2021 मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून 'गोवा दमण दीव वृक्ष संवर्धन अधिनियम 1984' नुसार स्थापन केलेले जिल्हा वृक्ष प्राधिकरण निष्क्रिय असल्याचा दावा केला होता. या प्राधिकरणात सरकारी सचिव, जिल्हाधिकारी, दोन आमदार तसेच वन संरक्षकांचाही समावेश होता. या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. जावळकर आणि एम. एस. सोनक यांनी वृक्ष प्राधिकरणाची तीन महिन्यांतून एकदा बैठक घेण्याचे तसेच राज्यातील झाडांची मोजणी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. (Trees In Goa)

न्यायालयाच्या निर्देशानुसार, वन खात्याने 18 एप्रिल 2022 पासून राज्यातील सर्व झाडांची मोजणी करण्याचे निश्चित केले होते. झाडांची स्थानिक आणि शास्त्रीय नावांसह नोंद करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात 10 पथके स्थापन करण्यात आली होती. तसेच तालुका प्रभारी म्हणून 12 उप वनसंरक्षक (डीएफएस) व सहाय्यक वनसंरक्षकांची (एएफएस) नेमणूक केली होती. तसेच ही गणना चार महिन्यांतून एकदा केली जाते. (Trees In Goa)

पेडणे, बार्देश, डिचोली, तिसवाडी या तालुक्यांसाठी मुख्य वनसंरक्षक केशव कुमार मिश्रा पर्यवेक्षक होते. या तालुक्यांतील पथकांचे नेतृत्व अनिशा कलकूर, यशोदा, ए. जबेस्टिन आणि आनंद जाधव या उपवनसंरक्षकांकडे होते. फोंडा, सत्तरी, धारबांदोडा आणि सासष्टीसाठी पर्यवेक्षक म्हणून वन संरक्षक डॉ. दिनेश कन्नन यांची नेमणूक करण्यात आली होती. येथील पथकांचे नेतृत्व जीझ वेर्की, संतोष फडते, राजू देसाई आणि प्रेमकुमार यांनी केले होते. तर, मुरगाव, सांगे, केपे आणि काणकोणसाठी पर्यवेक्षक म्हणून मुख्य वन संरक्षक सौरभ कुमार यांची नेमणूक करण्यात आली होती. तेथील पथकांचे नेतृत्व विशाल सुर्वे, अनिकेत गावकर, अमर हेबळेकर आणि दामोदर सालेलकर यांनी केले होते. (Trees In Goa)

राज्यातील झाडांचा तालुकानिहाय आढावा (ऑगस्ट 2022 पर्यंत)

उत्तर गोवा
पेडणे – 23,400
बार्देश – 24,281
डिचोली – 9,396
तिसवाडी – 24,899
फोंडा – 13,421
सत्तरी – 7,127
एकूण – 1,02,524

दक्षिण गोवा
धारबंदोडा – 22,088
सासष्टी- 15,528
मुरगाव – 19,531
सांगे – 27,329
केपे – 16,255
काणकोण – 22,766
एकूण – 1,23,497

उत्तर व दक्षिण एकूण – 2,26,021

(एप्रिल 2023 पर्यंत)

उत्तर गोवा
पेडणे – 34,109
डिचोली – 17,583
सत्तरी – 16,121
बार्देस – 31,938
तिसवाडी – 32,492
एकूण – 1,32,243

दक्षिण गोवा
फोंडा – 20,239
धारबंदोडा – 30,654
सासष्टी – 31,593
मुरगाव – 35,782
केपे – 39,700
सांगे – 43,193
काणकोण – 47,981
एकूण – 2,49,142

उत्तर व दक्षिण एकूण – 3,81,385

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news