गोवा : नाराज काँग्रेस आमदारांची प्रदेशाध्यक्षांकडून मनधरणी | पुढारी

गोवा : नाराज काँग्रेस आमदारांची प्रदेशाध्यक्षांकडून मनधरणी

मडगाव; पुढारी वृत्तसेवा: राज्यात काँग्रेसमध्ये फुटाफुटीचे वृत्त असताना राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर काँग्रेसच्या ७ आमदारांना घेऊन मडगावमधील हॉटेल मॅजेस्टिकमध्ये दाखल झाले आहेत. या आमदारांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी अमित पाटकर यांनी मनधरणी करत शर्तींचे प्रयत्न सुरू केले आहेत. आमदार मायकल लोबो, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर, एल्टन डीकॉस्ता, केदार नाईक, युरी आलेमाव, रुडॉल्फ फर्नाडिस आणि अलेक्स सिक्वेरा हॉटेलवर दाखल झाले आहेत.

गोवा : साखळी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची विधिवत पूजा

दरम्यान, काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा भाजपाकडून उठवण्यात आलेली आहे, असा दावा पाटकर यांनी केला आहे. आमचे सर्व आमदार एकत्रित आहेत. उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाची तयारी म्हणून सर्व आमदारांची हॉटेलवर बैठक बोलावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी याबैठकीला उपस्थिती लावली नव्हती. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल पाटकर यांना विचारले असता ते शनिवारीपासून पर्तगाळ येथे मठात असल्याचे त्यांनी सांगितले.

Maldives Trip : पती, पत्‍नी आणि प्रेयसी…मालदीव्‍हची ‘ती’ ट्रीप आणि पती गजाआड!

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशाचे वृत्त म्हणजे एक अफवा आहे, असा दावा केला आहे. नुकतेच दाखल झालेले मायकल लोबो यांनी बैठकीनंतर सविस्तर बोलू, असे सांगितले आहे. आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्या मालकीच्या या हॉटेलमध्ये गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव हे सकाळपासून ठाण मांडून आहेत. प्राप्त माहितीनुसार ७ आमदार भाजपमध्ये जाण्यासाठी सज्ज असून नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्यासाठी सर्व प्रक्रिया अडकून पडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काँग्रेसचे ११ पैकी ८ ते ९ आमदार भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना दुजोरा मिळत आहेत. आज (दि. १०) सुट्टीचा दिवस असूनही गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर पर्वरी येथील सचिवालयात दाखल झालेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button