पुणे : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने दोघांना मारहाण | पुढारी

पुणे : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने दोघांना मारहाण

पुणे : शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून दोघांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. भिंतीवर ढकलून दिल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी निखिल चव्हाण (वय 25, रा. मार्केट यार्ड) व एक अनोळखी व्यक्ती, अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अमित आसवाणी (वय 26, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना कल्याणीनगर येथे रविवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. फिर्यादी व त्यांचा मित्र मयूर कोडवाणी हे येथील आयटी पार्कच्या बिल्डिंगच्या लिफ्टमधून खाली येत होते. त्या वेळी आरोपींनी फिर्यादी व इतर लोकांना शिवीगाळ केली. दरम्यान, मयूर कोडवाणी यांनी आरोपींना ‘शिवीगाळ का करता?’ असे विचारले. त्या वेेळी आरोपींनी फिर्यादी व त्यांचा मित्र कोडवाणी या दोघांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. लिफ्टबाहेर आल्यानंतर त्यांना भिंतीवर ढकलून दिले. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली .

Back to top button