Goa Marathi Film Festival | गोव्यात आजपासून 15 वा 'गोवा मराठी चित्रपट महोत्सव' मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन!

Goa Marathi Film Festival | मान्यवर कलाकारांची उपस्थिती; महेश मांजरेकरांच्या 'बंडखोर'ने उद्घाटन
Film
FilmPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित १५ वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव शुक्रवारी, दि. ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान पणजी येथील आयनॉक्स आणि मॅकेनिज पॅलेस येथे दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते महोत्सवाचे संध्याकाळी ५ वा. आयनॉक्स येथे उद्घाटन होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

Film
Nashik Municipal Corporation | नाशिक मनपाचा ठेकेदारांना दणका; रस्ते कामात विलंब करणाऱ्यांची होणार चौकशी!

महोत्सावाच्या १५ व्या आवृत्तीत समकालीन मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्य आणि समृद्धीचे दर्शन घडवण्यात येणार असून, प्रस्थापित दिग्दर्शक, नवोदित चित्रपट निर्माते, नामवंत कलाकार आणि गोव्यासह विविध भागांतील चित्रपटप्रेमी एकत्र येणार आहेत. यंदाच्या महोत्सवात कौटुंबिक, विनोदी, सामाजिक आशय असलेले, तसेच मानवी भावविश्व उलगडणारे विविध चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविण्यात आलेल्या चित्रपटांसह काही विशेष प्रीमियरही रसिकांना पाहायला मिळणार आहेत. महोत्सावाच्या उद्घाटनाचा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित 'बंडखोर' हा असणार आहे. महेश मांजरेकर स्वतः कलाकार आणि तांत्रिक चमूसह चित्रपटाचे सादरीकरण करणार आहेत.

प्रियदर्शिनी इंदलकर, छाया कदम तसेच गोव्यातील अनेक कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संजय शेट्ये यांनी केली असून, या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर महोत्सवात होणार आहे. दरम्यान, महोत्सवातील चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची ऑनलाइन (ॲप आणि वेबसाईट) नोंदणी गरजेची आहे.

मोहन जोशी यांना कृतज्ञता पुरस्कार

भारतीय रंगभूमी, मराठी चित्रपट, तसेच हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा मराठी चित्रपट महोत्सवाचा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यात हा पुरस्कार जोशी यांना प्रदान केला जाणार आहे.

Film
Nashik Pune Railway | नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा वाद अखेर सुटणार! डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

हे चित्रपट पाहण्याची संधी

यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात अनेक महत्त्वाचे प्रीमियर आणि स्क्रीनिंग होणार आहेत. यात साबर बाँड, क्रांतिज्योती विद्यालय, उत्तर, फर्स्टक्लास दाभाडे, तिघी, तो ती आणि फुजी, तुंबादची मंजुळा, मर्दिनी, भूतम भयम्, अगं अगं सुनबाई, काय म्हणतात सासूबाई आणि घबाडकुंड हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याचप्रमाणे पिशवी आणि स्नोफ्लॉवर या चित्रपटांचे प्रीमियर शो देखील यावेळी होणार आहेत.

हे कलाकार असणार उपस्थित

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, तंत्रज्ञ आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती या चित्रपट महोत्सवाला लाभणार आहे. प्रेक्षकांना मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यावर्षी सचिन खेडेकर, रेणुका शहाणे, मृणाल कुलकर्णी, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, स्वप्नील जोशी, अनिता दाते, जितेंद्र जोशी, ललित प्रभाकर, निर्मिती सावंत, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके, प्रार्थना बेहेरे, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी गोडबोले यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news