Goa election 2022 : तीन महिला पोहोचल्या विधानसभेत | पुढारी

Goa election 2022 : तीन महिला पोहोचल्या विधानसभेत

पणजी : पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीत तीन महिला उमेदवारांनी विजय मिळवलेला आहे. 2017 च्या निवडणुकीत दोन महिला उमेदवार आमदार बनल्या होत्या. त्यापैकी केवळ जेनिफर मोन्सेरात या पुन्हा विधानसभेत पोहोचल्या आहेत. विधानसभेच्या 2017 मधील निवडणुकीत मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार एलिना साल्ढाणा आणि काँग्रेसच्या उमेदवार जेनिफर मोन्सेरात या ताळगाव मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. नंतर जेनिफर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आताच्या निवडणुकीतही जेनिफर या भाजपच्या उमेदवार म्हणून विजयी झाल्या आहेत.

डॉ. दिव्या राणे या भाजपच्या उमेदवार पर्ये मतदारसंघातून तर दिलायला लोबो या काँग्रेसच्या उमेदवार शिवोली मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. डॉ. दिव्या व दिलायला यांनी प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवली आणि यश प्राप्त केले आहे. एलिना यांनी भाजपमधून आपमध्ये प्रवेश केला, पण या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या.

उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनी 2017 ची निवडणूक सांगे मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून लढविली होती आताची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती. दोन्ही वेळी त्या पराभूत झाल्या.

हेही वाचलत का ?

Back to top button